Close

Yog Day Celebrated in Hindi Vishwavidyalay

हिंदी विश्‍वविद्यालयात आंतरराष्‍ट्रीय विश्‍व‍ योग दिवस साजरा

देह, चित्‍त आणि आत्‍मा यांचे आरोग्‍य हाच योग : प्रो. रजनीश कुमार शुक्‍ल
वर्धा, 21 जून, 2022 : देह, चित्‍त आणि आत्‍मा यांचे आरोग्‍य हाच योग होय असे प्रतिपादन महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. रजनीश कुमार शुक्‍ल यांनी केले. ते आठव्‍या आंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्‍त आयोजित कार्यक्रमात अध्‍यक्ष म्‍हणून बोलत होते.
विश्‍वविद्यालयात ‘मानवतेसाठी योग’ या सूत्रवाक्‍यावर मोठ्या उत्‍साहात योग दिवस साजरा करण्‍यात आला. ते म्‍हणाले की भारत सरकार कडून आज़ादीच्‍या अमृत महोत्‍सवानिमित्‍त देशभरातील प्रतिष्ठित 75 संस्‍था व विश्‍वविद्यालयांची आंतरराष्‍ट्रीय योग दिवस साजरा करण्‍यासाठी निवड झाली आहे. या दृष्टीने या वर्षीचा योग दिवस विश्‍वविद्यालयासाठी गौरवाचा विषय आहे. यावेळी प्रमुख पाहुण्‍या चंद्रमौलि चैरीटेबल ट्रस्‍ट, वाराणसीच्‍या अध्‍यक्ष आणि प्रख्‍यात संस्‍कृत साधिका डॉ. लूसी गेस्‍ट, लंडन व विद्यार्थी प्रतिनिधी आबिद रजा, खुशबू उपस्थित होते. या प्रसंगी योग तज्‍ज्ञ योगिक विज्ञान, योग संस्‍कार संस्‍थान, नागपूरचे मुकूल गुरू यांनी योगाभ्‍यास व प्राणायाम सादर केले. भारत सरकारच्‍या वतीने योग दिनाचा मुख्‍य कार्यक्रम मैसूर पॅलेस, कर्नाटक येथे आयोजित केला गेला. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण बघण्‍याची व्‍यवस्‍था अटल बिहारी वाजपेयी भवन येथे करण्‍यात आली. या कार्यक्रमात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले.
विश्‍वविद्यालयात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी कुलगुरू प्रो. शुक्‍ल यांनी डॉ. लूसी गेस्‍ट व मुकुल गुरु यांचे स्‍वागत शॉल, सूतमाला व स्‍मृती चिन्‍ह देवून केले. कार्यक्रमाचा समारोप राष्‍ट्रगीताने झाला. कायर्क्रमाचे संचालन सहायक प्रोफेसर डॉ. सीमा बर्गट यांनी केले. यावेळी प्रकुलगुरू द्वय प्रो. हनुमानप्रसाद शुक्ल व प्रो. चंद्रकांत रागीट, कुलसचिव कादर नवाज खान यांच्‍यासह शिक्षक, अधिकारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

View Image हिंदी विश्वविद्यालय योग दिवस
View Image हिंदी विश्वविद्यालय योग दिवस
View Image हिंदी विश्वविद्यालय योग दिवस
View Image हिंदी विश्वविद्यालय योग दिवस