जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय
योजना
- माजी सैनिक व माजी सैनिक विधवांना ओळखपत्र देणे
- माजी सैनिक व विधवांना मालमत्ता करातून सूट मिळणेकरीता प्रमाणपत्र देणे
- माजी सैनिक व माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना महाविद्यालयीन प्रवेशाकरीता ५% आरक्षणाबाबतचे प्रमाणपत्र देणे
- नविन सेवानिवृत्त झालेल्या माजी सैनिकांची रोजगार पटावर नोंदणी करुन त्यांना रोजगार नोंदणी कार्ड देणे
- वयाच्या ६५ वर्षावरील व कोणतेही उत्पन्नाचे साधन किंवा पेंशन नसलेल्या माजी सैनिक व विधवांना चरितार्थ आर्थिक मदत
- युध्दात किंवा मोहीमेत शहीद सैनिकांना शासनातर्फे एकरकमी रु. १,००,००,०००/- आर्थिक मदत
- सेवारत सैनिकाचा मृत्यु झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास रक्कम रु. ७५,०००/- पर्यंत आर्थिक मदत
- माजी सैनिकाच्या एका मुलीच्या विवाहाकरीता रु. १०,०००/- व माजी सैनिक विधवेच्या सर्व मुलींच्या विवाहाकरीता प्रत्येकी रु. १६,०००/- आर्थिक मदत तसेच अनाथ मुलीच्या विवाहाकरीता रु. ३०,०००/- आर्थिक मदत
- माजी सैनिक/विधवांच्या अपंग/मतिमंद पाल्यांना औषधोपचाराकरीता रु. ३६००/- वार्षिक आर्थिक मदत
- शाळेत जाणाऱ्या माजी सैनिक/विधवांच्या अपंग/मतिमंद पाल्यांना रु. २४००/- वार्षिक आर्थिक मदत
- माजी सैनिक/विधवांच्या अपंग/मतिमंद पाल्यांना कौशल्य वाढविण्याच्या प्रशिक्षणाकरीता वार्षिक रु. ७२००/- आर्थिक मदत
- माजी सैनिक/विधवांच्या अपंग/मतिमंद पाल्यांना स्वयंरोजगाराकरीता बँक किंवा वित्तीय संस्थेकडून घेतलेलया कर्जाचे ५०% किंवा जास्तीत जास्त रु. ३४,०००/-आर्थिक मदत
- ६५% अपंगत्व आलेल्या माजी सैनिकांना घर दुरुस्तीसाठी किंवा अस्तित्वात असलेल्या घरात बदल करण्यासाठी रु. ५०,०००/- आर्थिक मदत
- पॅराप्लेजीक सेंटर, खडकी, पुणे येथे उपचार घेत असलेल्या माजी अपंग सैनिकांना वार्षिक रु. २४,०००/- आर्थिक मदत
- युध्दविधवांना/सैन्यसेवेत सेवारत असतांना युध्दजन्य परिस्थिती व्यतिरिक्त इतर कारणांनी मृत्यु पावलेल्या सैनिकांच्या विधवांना घरकुलासाठी व सदनिका खरेदीसाठी रु. १,५०,०००/- आर्थिक सहाय्य
- माजी सैनीकांना घरबांधणीसाठी किंवा सदनिका खरेदीसाठी रु. ५०,०००/- आर्थिक मदत
- माजी सैनिकाचे/पत्नीचे/विधवेच्या अंत्यविधीकरीता रु. १०,०००/- आर्थिक मदत
- माजी सैनिक/विधवेच्या पाल्यांना शालेय शिक्षणाकरीता रु. २०००/- वार्षिक आर्थिक मदत (इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत)
- माजी सैनिक/विधवेच्या पाल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता रु. २०,०००/- आर्थिक मदत (विना अनुदानीत)
- माजी सैनिक/विधवेच्या पाल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता रु. २०,०००/- आर्थिक मदत (अनुदानीत)
- माजी सैनिक/विधवेच्या पाल्यांना परदेशात शिक्षणाकरीता रु. ५०,०००/- आर्थिक मदत
- माजी सैनिक/विधवेच्या पाल्यांना परराज्यात शिक्षणाकरीता रु. २०,०००/- आर्थिक मदत
- माजी सैनिक/विधवेच्या पाल्यांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी मध्ये प्रवेश मिळालेल्या अधिकारी, जेसीओ व इतर रँक यांचे पाल्यांना सत्रशुल्काचे अनुक्रमे ५०%, ७५% व १००% आर्थिक मदत
- सैनिकी शाळेत शिकणाऱ्या माजी सैनिक/विधवेच्या पाल्यांना रु. ३२,०००/-आर्थिक मदत
- शासनमान्य खाजगी अभ्यासक्रमासाठी माजी सैनिक/पत्नी/विधवा/पाल्य यांना जास्तीत जास्त रु. ६०००/- आर्थिक मदत
- माजी सैनिक/विधवा यांचे पाल्यांना संगणक प्रशीक्षणाकरीता रु. ४०००/-आर्थिक मदत
- माजी सैनिक/विधवा यांच्या इयत्ता १० वी मध्ये ६०% पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या पाल्यांना रु. २५००/- पर्यंत वार्षिक व इयत्ता १२ वी मध्ये ६०% पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या पाल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता रु. ५०००/- वार्षिक शिष्यवृत्ती
- माजी सैनिक/पत्नी/विधवा/पाल्य यांना रु. १०,०००/- राज्यस्तरावर विशेष गौरव पुरस्कार
- NDA/IMA/OTA व समतुल्य संस्थेमध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिक/विधवा यांचे पाल्यांना प्रोत्साहन म्हणून रु. ५०,०००/- आर्थिक मदत
- माजी सैनिकांना स्वयंरोजगाराकरीता रु.३४,०००/- आर्थिक मदत
- माजी सैनिक/विधवा यांच्या पाल्यांना वाहन प्रशिक्षणाकरीता रु. १०००/- पर्यंत एकरकमी आर्थिक मदत
- माजी सैनिक/विधवा यांना MS CIT प्रशीक्षणाकरीता रु. २५००/- आर्थिक मदत
- माजी सैनिक पत्नी/विधवा यांच्या बचत गटांना स्वयंरोजगाराकरीता बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या ५० % किंवा जास्तीत जास्त रु. ५,००,०००/- पर्यंत आर्थिक मदत
- माजी सैनिक/विधवा यांचे पाल्यांकरीता आरती चौक, वर्धा येथे सैनिकी मुलींचे वसतिगृह असून क्षमता ५० विद्यार्थीनींची आहे. सदर वसतिगृहात माजी सैनिक/विधवा तसेच जागा शिल्लक असल्यास इतर नागरीकांच्या मुलींना प्रवेश देण्यात येते.
- माजी सैनिक/विधवा यांचे पाल्य ज्या ठिकाणी शिकत आहेत त्या ठिकाणी सैनिकी वसतिगृह उपलब्ध नसल्यास त्यांना वार्षिक रु. ८०००/- पर्यंत वसतिगृह खर्च प्रतिपूर्ती देण्यात येते.
योजना
अनु.क्र. | योजना | संक्षिप्त | प्रकार |
---|---|---|---|
१ | बेनेवोलेंट निधी | बालशिक्षण, वैद्यकीय, मृत्यू, मुलींचे विवाह, स्वयंरोजगारासाठी माजी सैनिक व विधवा यांना अनुदान | राज्य शासन |
२ | विशेष निधी | मुलींचे वसतिगृह चालविण्यावरील खर्च व वसतिगृहाच्या फी प्रतिपूर्तीचा पुरस्कार | राज्य शासन |
३ | ध्वजरोहन निधी | — | राज्य शासन |
३ | जागतिक युद्ध २ अनुदान | — | राज्य शासन |