अल्पसंख्याक प्रिमॅटीक शिष्यवृत्ती योजना
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | १) विद्यार्थ्याचा शाळेमार्फत ऑनलाईन अर्ज २)विद्यार्थ्याचै आधार कार्ड ३) शाळेत असल्याबाबतचे बोनाफाईड सर्टीफिकेट ४) पालकाचा उत्पानाचा दाखला (५) अल्पसंख्यांक असल्याबाबतचे स्वयं:घेाषनापत्र |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | १) शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रिडा विभाग दि. २३ जुलै २००८ |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | १) अर्जदार इ. १ली ते १० वी तील अल्पसंसंख्याक विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अर्ज २. पालकांचे उत्पन्न मर्यादा १,५०,०००/- आत असणे आवश्यक ३. अल्पसंख्यांक असल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र ४. शाळेचे बोनाफाईड सर्टीफिकेट ५. मागील वर्षीचे शालेय गुण ६०% पेक्षा जास्त आवश्यक ६. फ्रेश विद्याथ्र्याची निवड हि केंद्राने दिलेल्या धार्मीक कोटयानुसार केली जाते. |
ऑनलाईन सुविधा आहे का – | होय |
असल्यास सदर लिंक – | www.schlolarship.gov.in (National Scholarship Portal) |
आवश्यक शुल्क | — |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | — |
निर्णय घेणारे अधिकारी – | सदर ऑनलाईन आवेदन हे मुख्याध्यापक मार्फत जिल्हा लॉगीनला व नंतर स्टेट लॅागीनला फारवर्ड केले जातात. अल्पसंख्यांक कार्य मंत्रालय भारत सरकार कडून सदर योजनेत शिष्यवृती पात्र विद्यार्थ्याची निवड धर्म निहाय कोटयानुसार गुणवत्त्तेच्या आधारे केले जाते. |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | ८ ते १० महिने |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | www.dmae.maharashtra.gov.in |
कार्यालयाचा पत्ता | अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालय, महाराष्ट राज्य, डॅा. आंबेडकर मार्ग, पूणे-४११००१. |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | ०२०/२६१२६७२६/२६१२३४९५ |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | directoradult1@gmail.com, dir_adulteducation@yahoo.in |