महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
भारत देशात सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याने सुरु केलेली रोजगार हमी योजना केंद्र शासनाने २००५ च्या कायदा अन्वये वर्धा जिल्ह्यात राबवण्यात येत आहे . ग्रामीण भागात अकुशल रोजगार उपलब्धते सोबतच शाश्वत संसाधनाची निर्मिती करणे हा योजनेचा मुख्य उद्देश असून योजनेंअंतर्गत कृषी, जलसंधारण, ग्रामविकास, सिंचन यासह वैयक्तिक व सार्वजनिक लाभाची कामे हाती घेण्यात येतात. कामांच्या मागणीनुसार ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला आर्थिक वर्षात किमान 100 दिवस केंद्र शासनाकडून व उर्वरित दिवस राज्य सरकारकडून असा एकूण 365 दिवस अकुशल रोजगार उपलब्ध करून देण्यात येतो.योजनेंतर्गत एकूण २६६ प्रकारची कामे अनुज्ञेय असून वर्धा जिल्ह्यात प्रधान्याने राबविण्यात येणाऱ्या खालील प्रमाणे कामांच्या माध्यमातून लाभ देण्यात येतात.