जिल्हा ग्रंथालय
विभागाची माहिती | |
---|---|
जिल्हा ग्रंथालय भारत सरकारच्या ग्रंथालय विकास योजनेअंतर्गत 1955 मध्ये तत्कालीन मध्यप्रांतातील अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, चंद्रपूर व वर्धा या आठ जिल्हयामध्ये शासकीय जिल्हा ग्रंथालये स्थापन करण्यात आली. स्वातंत्रयानंतरच्या पहिल्या दशकातच नवसाक्षर जनता व बाल वाचकांना केंद्रबिंदू मानून तत्कालीन मध्यप्रदेश शासनाने 1955 मध्ये शासकीय जिल्हा ग्रंथालय, वर्धा या कार्यालयाची स्थापना केली. सन 1955 मध्ये मध्यप्रदेश शासनाने 4-क या नांवाने ही योजना या कार्यालयाच्या माध्यमातून केली. ग्रामीण भागातील वाचनाकांना सुलभतेने,सहजपणे सकस असे वाचन साहित्य उपलब्ध व्हावे.हा प्रमुख उदेश्य साध्य व्हावेत म्हणून कार्यान्वित केलेली हि योजना राज्य पुनर्रचनेनंतर 1956 मध्ये विदर्भ भाग तत्कालीन मुंबई राज्यात समाविष्ट झाल्यानंतर तसेच 1 मे 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर आजपावतो तशीच चालू ठेवण्यात आली. वर्धा जिल्हयातील शहरी तथा ग्रामीण भागातील जनतेमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी,वाचन संस्कृती जोपासली जावी. ग्रंथ व इतर वाचन साहित्य उपलब्ध करून देणे इत्यादी उदेशास अनुसरून हे ग्रंथालय स्थापित करण्यात आले आहे.जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, वर्धा हे कार्यालय स्वत:च्या 11200 चौ.फुट जागेच्या इमारतीत जिल्हा परिषद गांधी शाळेशेजारी, बस स्थानकाजवळ,वर्धा येथे कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे दिनांक 27 नोव्हेंबर 2013 च्या शासन निर्णया नुसार राज्यातील सहाय्यक ग्रंथालय संचालक या कार्यालयांचे विकेंद्रीकरण करण्यात आले.त्यानुसार सहाय्यक ग्रंथालय संचालक,नागपूर विभाग,नागपूर या कार्यालयाचे विकेंद्रीकरण होवून शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे सहाय्यक अनुदानबाबतचे कार्य शासकीय जिल्हा ग्रंथालय, वर्धा या कार्यालयातून कार्यान्वित होत आहे.तसेच कार्यालयाचे नांव शासकीय जिल्हा ग्रंथालय, वर्धा ऐवजी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, वर्धा असे नामकरण झाले आहे. |
![]() नितीन यं.सोनोने |
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे/ नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे. | शासन निर्णय , उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्र मराग्र2527/ प्र.क्र.156/2017/साशि-5 , दिनांक-22 फेब्रुवारी 2018 |
योजनेची थोडक्यात माहिती | वाचक सभासद – 1. संस्था सभादत्व 2. वैयक्तिक सभासदत्व |
योजने मध्ये देण्यात येणारे लाभ | वाचकांना विविध प्रकारचे ग्रंथ व नियतकालिके व दिवाळी अंक उपलब्ध करून दिले जातात. |
आवश्यक कादपत्रे | 2 पासपोर्ट साईज फोटो , ओळखपत्रांची छायांकित प्रत(आधार कार्ड, वीज बील) |
अर्ज कुठे करावा (ऑलाईन/ऑनलाईन) | ऑफलाईन |
सदर लिंक | www.dlowardha.dol@maharashtra.gov.in |
आवश्यक शुल्क | 1) वैयक्तिक सभासद -10रू. सभासद अर्ज, 500 रु.अनामत रक्कम (परतावा) 100 रू. व्दिवार्षिक फी (ना-परतावा) 2. संस्था सभासदत्व – 2500/-, अनामत रक्कम (परतावा) प्रवेश शुल्क 100/-, अर्ज – 10/- |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | एक दिवस |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | www.dlowardha.dol@maharashtra.gov.in |
कार्यालयाचा पत्ता | महात्मा गांधी जिल्हा परिषद शाळेशेजारी, बसस्थानकाजवळ, बजाज चौक,वर्धा -442001 |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | 9403254872 |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | dlowardha.dol@maharashtra.gov.in |