जिल्हा अन्न नागरी पुरवठा विभाग
विभागाची माहिती | |
---|---|
अन्न नागरी पुरवठाआणि ग्राहक संरक्षण विभाग कृषी, अन्न व सहकार विभागातून पुरवठा विभाग स्वतंत्र करून मार्च, १९६५ मध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाची निर्मिती करण्यात आली. डिसेंबर, १९७७ मध्ये उद्योग, उर्जा आणि कामगार विभागातून वजने व मापे यांचे व्यवस्थापन काढून घेऊन ते नागरी पुरवठा विभागाच्या नियंत्रणाखाली आणण्यात आले. हा विभाग मुख्यत्वे करून खुल्या व्यापारामधील जीवनावश्यक वस्तूंची मागणी व पुरवठा तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेसंबंधीत बाबींचे नियंत्रण करतो. या विभागाची मुख्य जबाबदारी जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ खालील विविध नियंत्रण आदेशांना लागू करून किंमती स्थीर ठेवणे व वजने व मापे संबंधित बाबींवर कार्यवाही करणे ही आहे. |
1 )अंत्योदय अन्न योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) योजनेची थोडक्यात माहिती |
अन्न नागरी पुरवठाआणि ग्राहक संरक्षण विभाग यांचयामार्फत वेळोवेळी निर्गमित होणारे शासन निर्णय इतर आदेश परिपत्रक इत्यादी नियमानुसार सादर कामकाज पूर्ण केले जाते |
योजनेची थोडक्यात माहीती | अंत्योदय अन्न योजना १ मे २००१ पासून अस्तित्वात आली या योजनेंतर्गत, विधवा किंवा अशक्त आजारी व्यक्ती किंवा अपंग व्यक्ती किंवा 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्ती किंवा एकल महिला किंवा कोणतेही सामाजिक समर्थन अथवा उदरनिर्वाहाचे साधन नसलेले अविवाहित पुरुष. सर्व आदिम आदिवासी कुटुंबांना प्राधान्य दिले गेले. |
योजने मध्ये देण्यात येणारे लाभ | गरीब कुटुंबांना या योजनेंतर्गत दि. १/५/२००१ पासून अन्नधान्य (गहू १० किलो प्रति शिधापत्रिका आणि तांदूळ २५ किलो प्रति शिधापत्रिका ) पुरवले जाते. |
आवश्यक कागदपत्रे | आधार कार्ड , जन्माचा दाखला, उत्पन्नाचा दाखला |
अर्ज कुठे करावा. (ऑफलाईन/ऑनलाईन) | जवळपासच्या तालुका अन्न नागरी पुरवठा कार्यालयाला भेट द्या किंवा पृष्ठावरील नागरिकांविषयी मेनूमधून सेवा टॅबमध्ये उपलब्ध ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीद्वारे अर्ज करा. |
सदरलिंक – | https://grievances.maharashtra.gov.in |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | 30 दिवस |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | https://grievances.maharashtra.gov.in |
आवश्यक शुल्क | निशुल्क |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | http://164.100.236.56/ |
कार्यालयाचा पत्ता | विकास भवन मागे सिव्हिल लाईन्स वर्धा |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | 07152-243314 |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेलआयडी | dsowar.1234@gmail.com |
2 )प्राधान्य कुटुंब योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) योजनेची थोडक्यात माहिती |
अन्न नागरी पुरवठाआणि ग्राहक संरक्षण विभाग यांचयामार्फत वेळोवेळी निर्गमित होणारे शासन निर्णय इतर आदेश परिपत्रक इत्यादी नियमानुसार सादर कामकाज पूर्ण केले जाते |
योजनेची थोडक्यात माहीती | राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी निकष ठरवितांना लक्ष्य निर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत लाभ घेत असलेल्या (ब-1) मधील लाभार्थ्यांपैकी ज्या लाभार्थ्यांनी सन 2011 मध्ये विहित नमुन्यात वार्षिक कौटुंबिक उत्पन्न नमूद केले आहे, त्या उत्पन्नानुसार शहरी भागात कमाल रु. 59,000/- पर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांचा पात्र लाभार्थी म्हणून व ग्रामीण भागात कमाल रु. 44,000/- पर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांचा पात्र लाभार्थी म्हणून समावेश करणेबाबत दिनांक 17.12.2013 च्या शासन निर्णयान्वये निर्णय घेण्यात आला आहे. सदर लाभार्थ्यांकडील केशरी शिधापत्रिकांवर प्रथम पृष्ठावर “वरील उजव्या कोपऱ्यात” “प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी” असा शिक्का मारण्यात आला आहे.. |
योजने मध्ये देण्यात येणारे लाभ | दि. 1 फेब्रुवारी, 2014 पासून राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी सुरु झालेली आहे. त्यानुसार लाभार्थ्यांचे अंत्योदय गट व प्राधान्य गट असे दोन गट अस्तित्वात आले असून प्राधान्य गटाच्या लाभार्थ्यास प्रतिमाह प्रतिव्यक्ती 5 किलो (गहू १ किलो प्रति लाभार्थी आणि तांदूळ ४ किलो प्रति लाभार्थी )अन्नधान्याचे वाटप करण्यात येते |