बंद

जिल्हा रेशीम कार्यालय

विभागाची माहिती
जिल्हा रेशीम कार्यालय
विभागाची माहिती :- रेशीम शेती उद्योग हा कृषि वर आधारीत रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला ग्रामीण भागाचा कायापालट करणारा उद्योग आहे. वर्धा जिल्हयाची भौगोलीक परिस्थीती व हवामान रेशीम शेती उद्योगास अत्यंत अनुकुल असुन उत्पादनाची शाश्वती व नैसर्गिक धोक्यापासुन वाचवणारा उद्योग आहे. पावसाची अनियमीतता, निसर्गाचा लहरीपणा वेळेत उपलब्ध होऊ न शकणारा मजुर वर्ग, बेभरवश्याची बाजारपेठ आणि कच्च्या मालाची अनिश्चितता या सर्व बाबीमुळे शेतीच्या उत्पादनावर जेवढा खर्च होतो तेवढे उत्पन्न ही मीळत नाही. पर्यायाने शेतीवर अवलंबुन राहणे दुरावास झालेले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी शेतीवर आधारीत पुरक उद्योग करणे काळाची गरज आहे. रेशीम शेती उद्योग महाराष्ट्रामध्ये वाढावा यासाठी राज्यशासन विविध योजना राबवुन रेशीम संचालनालय, नागपूर यांचे मार्फत प्रयत्न आहेत. शेतकरी यांचे उत्पन्न दुप्पट करणे, रोजगार निर्मिती करणे व शेतकरी यांचे आर्थिक परिस्थिती मध्ये सुधारणा करणे हा शासनाचा मुख्य हेतु आहे. रेशीम उद्योगाच्या माध्यमातुन वर्धा जिल्हयात हे करता येणे शक्य आहे. त्या करिता मोठया प्रमाणात तुती लागवड करुन कोष निर्मिती करणे व कोषावर पुढील प्रक्रिया करणे करिता प्रयत्नरत आहे.

श्री.विलास शिंदे, जिल्हा रेशीम अधिकारी

योजनेचे नाव :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
तपशील स्पष्टीकरण
संबंधीत शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे/नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे) शासन निर्णय क्रमांक:मग्रारो-5/प्र.क्र. 79/रोहयो-5 दि. 31 मार्च 2016
योजनेची थोडक्यात माहिती सदर योजना तीन वर्षाची असुन तुती लागवड जोपासना संवर्धन, किटक संगोपन साहित्य व किटक संगोपनगृह बांधकाम या बाबींवर अनुदान अनुज्ञेय आहे
योजनेमधे देण्यात येणारे लाभ प्रथम वर्षाला 282 व्दितीय वर्षाला 200 व तृतीय वर्षाला 200 असे एकुण तीन वर्षामध्ये 682 मनुष्य दिवसाची मजुरी देण्यात येते.  तीन वर्षामध्ये विभागुन 32000 रुपये किटक संगोपन साहित्यासाठी देण्यात येते, तसेच किटक संगोपनगृह बांधकामासाठी 213 मनुष्य दिवसाची मजुरी व 121000 रुपयाचे साहित्य यानुसार लाभ देण्यात येतो.
आवश्यक कागदपत्रे 7/12, 8अ, जमीनीचा नकाशा,आधार कार्ड छायाप्रत , पॅनकार्ड छायाप्रत, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक छायाप्रत,पाणी उपलब्धता प्रमाणपत्र, जातीचा दाखला, ग्रामसभेचा ठराव, मनरेगा जॉब कार्ड, 2 पासपोर्ट फोटो
अर्ज कुठे करावा (ऑफलाईन/ऑनलाईन) अर्ज ऑफलाईन स्वरुपात जिल्हा रेशीम कार्यालय, प्रशासकिय भवन, पहिला माळा खोली नंबर 5, सेवाग्राम रोड वर्धा येथे प्रत्यक्ष भेट देऊन अर्ज करावा
सदर लिंक निरंक
आवश्यक शुल्क 500 रुपये प्रति एकर नोंदणी शुल्क
शुल्क असल्यास भरण्याची पध्दत रेशीम संचालनालय, नागपूर यांचे स्तरावरुन ऑनलाईन कार्यप्रणाली कार्यान्वीत नसल्याने प्रत्यक्ष कार्यालयात येऊन नोंदणी शुल्क भरणा करता येईल
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी योजनेस पात्र लाभार्थी असेल तर तात्काळ नोंदणी करण्यात येते
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लींक निरंक
सदर सेवा महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम (RTS) अंतर्गत उपलब्ध आहे किंवा नाही त्याचा तपशील सेवा उपलब्ध आहे.                                                                             1. रेशीम शेतक-यांची नोंदणी करणे.                                              2.रेशीम शेतकरी/लाभार्थी यांना तांत्रिक सेवा उपलब्ध करुन देणे
कार्यालयाचा पत्ता जिल्हा रेशीम कार्यालय, प्रशासकिय भवन, पहिला माळा खोली नंबर 5, सेवाग्राम रोड वर्धा येथे प्रत्यक्ष भेट देऊन अर्ज करावा
संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-299660,   9834753803
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी seriwardha@gmail.com

योजनेचे नाव :- सिल्क समग्र-2 योजना
तपशील स्पष्टीकरण
संबंधीत शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे/नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे) शासन निर्णय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग  विभाग, क्र. सपववि-40015/2/2023-DESK SERICULTURE-CMTD,दि. 09.02.2024
योजनेची थोडक्यात माहिती सदर योजने मधे 1 एकर तसेच 2 एकर तुती लागवडीसाठी , ठिंबक सिंचन, किटक संगोपनगृह बांधकाम , किटक संगोपन साहित्य अनुदान, निर्जंतुकीकरण औषधी या बाबींवर अनुदान अनुज्ञेय आहे.
योजनेमधे देण्यात येणारे लाभ अ.क्र. सिल्क समग्र-2 योजनेचा तपशील 2  एकर करिता 1 एकर
अनुसुचित जाती व जमाती 90 टक्के सर्वसाधारण 75 टक्के अनुसुचित जाती व जमाती 90 टक्के सर्वसाधारण 75 टक्के
तुती लागवड 108000 90000 54000 45000
ठिंबक सिंचन संच 90000 75000 54000 45000
किटक संगोपनगृह बांधकाम ( 22*50) चौ. सेमी 405000 337500 292500 243750
किटक संगोपन साहित्य 67500 56250 45000 37500
किटक संगोपन निर्जंतुकीकरण औषधी 4500 3750 4500 3750
मल्टीएंड रिलिंग युनिट 1868400 1557300
ARM (400 एंड) 3523500 2936250
किसान नर्सरी 135000 112500
चॉकी सेंटर 1170000 975000
आवश्यक कागदपत्रे 7/12, 8अ, जमीनीचा नकाशा,आधार कार्ड छायाप्रत , पॅनकार्ड छायाप्रत, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक छायाप्रत,पाणी उपलब्धता प्रमाणपत्र, जातीचा दाखला, सामाईक शेती असेल तर संमती पत्र  2 पासपोर्ट फोटो