नगर परिषदेकडून प्राप्त प्रकरणात भाडे निश्चिती करणे
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | 1)नगर परिषदेचे पत्र २)ठराव ३)मंजूर बांधकाम नकाशा ४)बांधकाम झालेली इमारत ज्या जमिनीवर आहे त्या जमिनीचे वार्षिक मुल्यदर तक्क्त्याच्या दराची प्रत, ५)मागील तीन वर्षातील खरेदी विक्री व्यवहार |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | १) महाराष्ट्र नगर परिषदा ,नगर पंचायतीव औद्योगिक नागरी अधिनियम ,१९६५ ,कलम ९२ २) स्थायी निदेश क्र. ३९ दि.१०/०८/२००६ |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | १)नगर परिषदेच्या मालकीच्या मालमत्तांचे अपेक्षित भाडे ठरविण्यासाठी मा.जिल्हाधिकारी वर्धा/ त्यांनी नाम निर्देशित केलेले प्रतिनिधी, ससंनर शाखा वर्धा व संबंधित नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांची त्रिसद्स्सीय समिती गठीत केलेली आहे . २)ठरावाची तपासणी करून मंजूर बांधकाम नकाशाप्रमाणे CARPET AREA काढण्यात येतो . ३)जमिनीचे मुल्य व बांधकामासाठी लागणारा एकूण खर्च अंदाजपत्रकावरून घेण्यात येतो. ४)प्रती चौ.मी. ला एका महिन्याचे भाडे काढले निर्धारित केले जाते . ५) सदर भाड्यावरून गाळ्यांचे भाडे ठरविले जाते. |
ऑनलाईन सुविधा आहे का – | नाही |
असल्यास सदर लिंक – | — |
आवश्यक शुल्क | — |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | चालान द्वारे |
निर्णय घेणारे अधिकारी – | सहाय्यक संचालक नगर रचना /मुख्याधिकारी/उपविभागीय अधिकारी |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | — |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | townplanner1wardha@rediffmail.com |
कार्यालयाचा पत्ता | जिल्हा क्रीडा संकुल, आंबेडकर चौक,सिविल लाईन्स,वर्धा -४४२००१ |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | ०७१५२-२४२६३९ |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | townplanner1wardha@rediffmail.com |