बंद

नगरपरिषद प्रशासन विभाग

विभागाची माहिती
नगरपरिषद प्रशासन विभाग
• नगर परिषद प्रशासन विभागांतर्गत जिल्ह्यातील सर्व नगरपालिका/नगरपंचायती यांचे कामकाज महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ अंतर्गत चालते.
• जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद/नगरपंचायत यांचेवर प्रशासकीय नियंत्रण ठेवणे
• केंद्र व राज्य शासनाच्या नगरपरिषद/ नगरपंचायत स्तरावर राबविण्यात येणाऱ्या योजनांचा वेळोवेळी आढावा घेणे.
• नगरपरिषद योजना, जिल्हा वार्षिक योजना,केंद्र शासनाच्या योजना यांची प्रशासकीय मान्यता व निधी वितरण कार्यवाही करणे.
• जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद/ नगरपंचायत यांचेकडून प्राप्त अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकास मान्यता देणे.
• स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा अभियान नगरपालिका/ नगरपंचायत क्षेत्रात प्रभावीपणे राबविण्यासाठी नियोजन करणे.
• नगरपरिषद/ नगरपंचायत कर्मचारी अस्थापना बाबी विषयक बाबत कार्यवाही करणे
• नगरपरिषद/ नगरपंचायत समिती सदस्य ,सभापती उपसभापती निवडणूक, सदस्य अपात्रता, अधिनियमातील तरतुदीनुसार दाखल होणारी विविध अपिले याबाबतची कार्यवाही करणे.
• दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्टीय नागरी उपजीविका अभियान(DAY-NULM) व PM स्वनिधी योजना प्रभावीपणे राबविणे.
ई-मेल आयडी – mawardha99@gmail.com

श्री.प्रशांत उरकुडे,जिल्हा सहआयुक्त
नगर परिषद प्रशासन विभाग

अ.न. नगर परिषद / नगरपंचायत नाव नगर परिषदेचा वर्ग लोकसंख्या

(सन २०११ च्या जनगणनेनुसार)

वर्धा अ वर्ग १०६४४४
हिंगणघाट अ वर्ग १०१८०५
आर्वी ब वर्ग ४२८२२
पुलगाव क वर्ग ३०४२४
देवळी क वर्ग १९२८८
सिंदी (रे) क वर्ग १२८५८
सेलू नगरपंचायत १३७४०
कारंजा (घा) नगरपंचायत १३३६९
आष्टी नगरपंचायत ११७१६
१० समुद्रपूर नगरपंचायत ७६५६