बंद

नगर रचना आणि मुल्यनिर्धारण विभाग

विभागाची माहिती
नगर रचना आणि मुल्यनिर्धारण विभाग
1. महसूल विभागामार्फत प्राप्त होणाऱ्या बांधकाम परवानगी प्रकरण, भूखंड विभाजन, भूखंड एकत्रिकरण प्रस्तावांची तांत्रिक छाननी करणे शेत जमीनीस रहिवास, औद्योगिक व वाणिज्य वापर यास्तव अकृषिक करण्यासाठी महसूल विभागाडून प्राप्त प्रस्तावांची छाननी करणे
2. विभागामार्फत मंजूर असलेल्या विविध विकास योजना नकाशांचे झोन दाखले व भाग नकाशे पुरविणे
3. नगर परिषद मार्फत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती योजने अंतर्गत प्राप्त होणाऱ्या बांधकाम प्रस्तावांची छाननी
4. मंजुरीचे शिफारस केलेले अभिन्यास नकाशाच्या /बांधकाम नकाशाच्या स्वाक्षांकीत प्रती उपलब्ध करुन देणे
5. नगर परिषदेकडून प्राप्त प्रकरणात भाडे निश्चिती करणे
6. शहरांसाठी विकास योजनेचे आराखडे (D.P.PLAN) तयार करणे.
7. जिल्हा वार्षिक योजना नवि-6अ योजने अंतर्गत नगर परिषदांना अर्थसहाय्य वितरीत करणे
8. निवाडा / भूसंपादन प्रकरणात संपादीत जमीनीचे मुल्यदर निश्चित करणे.
9. विविध जागा मागणी प्रस्तावाबाबत अभिप्राय / नाहरकत देणे.
10. खानपट्टा मंजूरी / नुतनीकरण बाबत अभिप्राय / नाहरकत देणे.
11. विकास परवानगी करीता फ्लो चार्ट
BPMS प्रणालीव्दारे अर्ज दाखल
उपविभागीय अधिकारी / इतर प्राधिकृत महसुल अधिकारी नगर रचना विभागाचे उचित
अभिप्राय उपविभागीय अधिकारी / इतर प्राधिकृत महसुल अधिकारी यांची मंजुरी / नामंजुरी.
तपशील स्पष्टीकरण
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे/ नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे. महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, 1966
भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965
एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली, 2020
माहितीचा अधिकार अधिनियम, 2005
महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम, 1966
महाराष्ट्र गुंठेवारी विकास (नियमीतीकरण दर्जावाढ व नियंत्रण) 2001
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015
योजनेची थोडक्यात माहिती लागू नाही.
योजने मध्ये देण्यात येणारे लाभ लागू नाही.
आवश्यक कादपत्रे
अर्ज कुठे करावा (ऑलाईन/ऑनलाईन) BPMS प्रणालीव्दारे https://mahavastu.maharashtra.gov.in
सदर लिंक https://mahavastu.maharashtra.gov.in
आवश्यक शुल्क प्रकरणानुसार शुल्क आकारण्यात येतील
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – विकास परवानगीकरीता 60 दिवस
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक
कार्यालयाचा पत्ता नगर रचना व मुल्यनिर्धारण विभाग, शाखा कार्यालय, वर्धा, जिल्हा क्रीडा संकुल, डॉ. आंबेडकर चौक, सिव्हील लाईन्स, वर्धा- 442001
संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-242639
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी townplanner1wardha@rediffmail.com