बंद

नवीन कौटुंबिक शिधापत्रिका देणे

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे 1.   विहित नमुण्यातील नमुना 1 अर्ज किंवा   सेतुमार्फत विहीत नमुन्यात साक्षांकित कागदपत्रांसह अर्ज. त्यावर रु. 5 कोर्ट फी स्टॅम्प चिकटवलेला तसेच कुटुंब प्रमुख महिलेचे पासपोर्ट साईज तीन फोटो.
2.     अधिवासाबाबतचा पुरावा.
अ.    मतदान ओळखपत्र/मतदार यादीतील नोंद
ब.   लाईट बिल किंवा घर टॅक्स पावती
क.    वाहन परवाना
वरील पैकी किमान दोन पुरावे आवश्यक
3.     कुटुंबाचा पत्ता/रहिवास पुरावा
अ.    आधारकार्ड (घरातील सर्व सदस्यांचे)
अ. कुटुंबप्रमुख यांचे राष्ट्रीयकृत बँकेचे खातेक्रमांकासह बँक पासबुक
ब. भाडे करार/पावती (स्वमालकीचे घर नसल्यास )
4.     कुटुंबाचे उत्पन्न ( ऊत्पन्नाचा दाखला)
अ.. कार्यालयाचे वेतनपत्र
ब.. उत्पन्नाबाबत घोषणापत्र
5.     गॅस एजन्सीचे कार्ड.
6.     नवीन शिधापत्रिका मिळणेसाठी आवश्यक शुल्क भरलेबाबत पावती.
7.     स्वयंघोषणापत्र
अ.    महाराष्ट्रात/भारतात इतरत्र कोठेही शिधापत्रिका नसलेबाबत – शिधापत्रिकेत नाव नसलेबाबत घोषणापत्र

संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) 1.     शासन निर्णय क्र. साविव्य -1099 प्र.क्र.8886/नापु.-28, दिनांक 5/11/99.
2.     शासन परिपत्रक क्रमांक साविव्सय 1099/3019/प्र.क्र. 8849 नापु-28, दिनांक 25/2/2000
3.     शासन निर्णय क्रमांक शिवाप-2013 प्र.क्र.105/नापू-28 दि. 29/6/2013.

निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी मुद्दा क्र. 2 मध्ये नमुद केलेल्या सर्व बाबी

ऑनलाईन सुविधा आहे का –
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क 1.पिवळी रु. 10/-
2. केशरी रु 20/-
3. शुभ्र रु. 50/-

शुल्क असल्यास भरण्याची पद्धत -रोखीने शासकीय पावती
निर्णय घेणारे अधिकारी – अन्नधान्य वितरण अधिकारी /तहसिलदार
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – 30 दिवस

ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक mahafood.gov.in‍ किंवा तक्रार निवारण क्रमांक – 1800-22-4950

कार्यालयाचा पत्ता जिल्हा पुरवठा अधिकारी, यांचे कार्यालय, सिव्हील लाईन वर्धा

संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-243314

संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी dsowar.1234@gmail.com