बंद

निवडणूक

विभागाची माहिती
निवडणूक विभाग
1.लोकसभा / विधानसभा /विधानपरिषद इत्यादी निवडणूक पारपाडणे.
2.मतदार यादी अद्यावत करणे.
3.मतदान केंद्र निश्चित करणे.
4.वर्धा लोकसभा मतदार संघात एकूण 06 मतदार संघाचा समावेश पुढील प्रमाणे होतो.(36-धामणगांव 43-मोर्शी /44-आर्वी / 45-देवळी /46-हिंगणघाट व
47-वर्धा

श्री अनिल गावित,उपजिल्हाधिकारी निवडणूक

तपशील स्पष्टीकरण
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे/ नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे. 1.लोकप्रतिनिधी कायदा 1950

2.लोकप्रतिनिधी कायदा 1951

3.मतदार नोंदणी नियम १1960
(THE REGISTRATION OF ELECTORS RULES, 1960)

3.निवडणूक संचालन नियम, 1961
(Conduct of Election Rule-1961)

4.परिसिमन कायदा, 2002
(The Delimitation Act, 2002,)

5.मा.भारत निवडणूक आयोग यांचेकडील विविध हस्तपुस्तीका.

6.मा.भारत निवडणूक आयोगाच्या वेळो वेळी पारीत सुचना शासन निर्णय इत्यादी.

योजनेची थोडक्यात माहिती 1.मतदार नोंदणी करणे :
अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविणे. व निरंतर प्रक्रिये द्वारे मतदार यांद्यांचे अद्यवतीकरण करणे.
2.”मतदारांचे पध्दतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग” SVEEP उपक्रम राबविणे.
योजने मध्ये देण्यात येणारे लाभ 1.मतदार नोंदणी करणे :-
लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1950 च्या नियम 14 मधील तरतुदीनुसार, चार अर्हता दिनांक (1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै, आणि 1 ऑक्टोंबर) निश्चित केलेले आहे. आणि त्यामुळे आगामी वर्षाच्या 1 जानेवारी या अर्हता दिनांकावार वार्षिक पुनरिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. त्याबरोबर आगामी वर्षातील पुढील 1 एप्रिल, 1 जुलै आणि, 1 ऑक्टोंबर या तीन अर्हता दिनांकावर आधारीत अगाऊ अर्ज स्विकारण्यात येतात.
2.मतदान केंद्राचे केंद्राचे सुसूत्रीकरण प्रस्ताव तयार करणे.
3.मतदारांचे पध्दतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग” SVEEP उपक्रम अंतर्गत नव मतदार, महिला मतदार, PVGTs तृतीय पंथीय मतदार यांच्या नोंदणी करिता विशेष शिबीराचे आयोजन करण्यात येतात.
आवश्यक कादपत्रे मतदार नोंदणी:-
1.नव मतदार / मतदार नोंदणी :-वय वर्ष 18 पुर्ण झालेल्या नवीन मतदारांसाठी अर्ज नमुना-6 भरून त्यासह खालील कागदपत्रे जोडणे वयाचा दाखला खालील पैकी कोणतेही एक 1.सक्षम स्थानिक संस्था/नगर प्राधिकरण/निबंधक जन्म व मूत्यू यांनी जारी केलेले जन्म प्रमाणपत्र 2.आधार कार्ड 3.पॅन कार्ड 4. वाहन चाल परवाना 5.जन्मदिनांक नमूद असलेले शासकीय दस्तऐवज 6.पारपत्र.
2.परदेशी मतदाराने मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज “फॉर्म ६अ”भरून त्यासह पुढील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. 1. विसा 2. पारपत्र
3.वगळणी :- मतदार यादीतून नाव काढून टाकण्यासाठी आक्षेप घेण्यासाठी मतदार अर्जाचा नमुना-“फॉर्म ७” यासह मयत व्यक्तींच्या बाबत मृत्युप्रमाणत्र – अर्जदाराचे घोषणापत्र अर्जात समाविष्ठ इत्यादि व वगळणीबाबत योग्य कारणासह कायदेशीर पुरावा.
4.दुरूस्ती निवासस्थान स्थलांतरित करण्यासाठी/विद्यमान
मतदार यादीतील नोंदी दुरुस्त करण्यासाठी/EPIC बदलण्यासाठी/Pwd चिन्हांकित करण्यासाठी मतदार अर्ज “फॉर्म ८”- सह अर्जदाराच्या नावे अथवा त्याच पत्त्यावर यापूर्वी मतदार म्हणून नेांद असेलेली कोणताही एक पालक/जोडीदार/सज्ञान मुलाच्या नावे असेलले राहिवासाच्या पूराव्याची स्वप्राणित प्रत (पुढीलपैकी कोणतेही एक दस्तऐवज एक दस्तावेज) –
1.अर्जात नमुद पत्ता असेले पाणी/वीज/गॅस जोडणीचे देयक (किमान एका वर्षाचे) 2.आधार कार्ड 3.राष्ट्रीयकृत/शेडयुल्ड बँक/ पोस्टाचे खाते पुस्तक 4.भारतीय पारपत्र 5. महसूल विभागाचा जमिनीची मालकी असलेबाबत पुरावा, किसान वही देखील चालेल 6.नोंदणीकृत भाडे करार (भाड्याने राहत असल्यास) 7. नोंदणीकृत विक्री खत (स्वत:चे घर असल्यास )
अर्ज कुठे करावा (ऑलाईन/ऑनलाईन) अर्जदार यांना ऑफलाईन अथवा ऑनलाईन अशा स्वरूपात अर्ज करता येईल.
अर्जदारास ऑफलाईन करिता संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे अथवा सदर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO अर्ज सादर करावा.
सदर लिंक 1.https://voters.eci.gov.in/login अथवा
2.Voter Helpline App https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen&hl=en-US
Voter Helpline App
3.https://voters.eci.gov.in/
आवश्यक शुल्क निशुल्क
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – किमान 7 दिवस अथवा आवश्यक कागदपत्रांच्या पुर्ततेअंती व सुनावणीसाठी लागणारा कालावधी.
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक 1.Election Help Desk Toll Free No.1950
2.https://voters.eci.gov.in/login
कार्यालयाचा पत्ता जिल्हाधिकारी कार्यालय नवीन इमारत, सेवाग्राम रोड महात्मा गांधी यांचे पुतळ्याजवळ सिव्हील लाईन, वर्धा पीन-442001
संपर्क दुरध्वनी क्रमांक (07152) 249776
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी dydeo.wardha1@gmail.com
जिल्हा संकेतस्थळ
1.https://wardha.gov.in/en/loksabha-election-2024/
2.https://wardha.gov.in /विधानसभा-सार्वत्रिक-निवड/