• सामाजिक दुवे
  • साईट मैप
  • Accessibility Links
  • मराठी
बंद

भूसंपादन (वि.पा.वि.म.)

विभागाची माहिती
भूसंपादन (वि.पा.वि.म.)
या कार्यालयामार्फत भूमी संपादन अधिनियम कायदा 1984 व भूमी संपादन, पुनर्वसन व पुर्नस्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियमए 2013 या कायदयान्वये बुडीत क्षेत्र व कालव्याचे, सरळ खरेदी कायदा, 12 मे, 2015 अन्वये अंतर्गत भूसंपादनाचे कामे, रेल्वे अधिनियम 1989(2008) अन्वये रेल्वेच्या भुसंपादन, तसेच राष्ट्रीय राजमार्ग अधिनियम 1956 अंतर्गत संपादनाचे कामे या केली जातात. या प्रकल्पातील संपादीत जमीनीबाबत कामकाज या कार्यालयामार्फत सुरू आहेत.
1. भूधारकास मोबदला वाटप करणे
2. कलम 28 खालील दावे संबधी कार्यवाही
3. भूसंपादन दाखला देणे
4. भूसंपादन नाहरकत दाखला देणे

या कार्यालयामार्फत खालील प्रकल्पाचे भूसंपादन करण्यात आलेले आहे.

अनु क्र. प्रकल्पाचे नाव संपादन संस्था
1 राष्ट्रीय महामार्ग क्र. 353 I    वाडी – आसोला सेलडोह-  पवनार  कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग नागपुर
2 वर्धा नांदेड न्यु बीजी लाईन उप‍ मुख्य अभियंता (नि) मध्य रेल्वे वर्धा
3 वर्धा बल्हारशा तिसरी रेल्वे लाईन उप‍ मुख्य अभियंता (नि) मध्य रेल्वे वर्धा
4 वर्धा (सेवाग्राम) नागपुर तिसरी चौथी रेल्वे लाईन उप‍ मुख्य अभियंता (नि) मध्य रेल्वे नागपुर
5 वर्धा बल्हारशा लेव्हल क्रॉसिंग क्र. 19 साठी 2 पदरी उड्डाण पुलाचे तसेच कमी उंचीचे भुमिगत  मार्गाचे बाधकामाकरीता कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धा
6 निम्न वर्धा प्रकल्पाचे बुडीत क्षेत्राकरीता निम्न वर्धा प्रकल्प विभाग वर्धा
7 देवळी शाखा कालव्याकरीता जामणी लघु कालव्याचे मातीकाम व बांधकामाकरीता निम्न वर्धा कालवे विभाग
8 शिरुड प्रकल्प थेट खरेदी प्रस्ताव लघु पाटबंधारे विभाग, वर्धा
9 दिंडोरा बॅरेज प्रकल्प  कार्यकारी अभियंता चंद्रपुर मध्यम प्रकल्प विभाग क्र.1 चंद्रुपुर
10 कार नदी प्रकल्प लघु पाटबंधारे विभाग, वर्धा
11 लोअर वणा प्रकल्प कार्यकारी अभियंता नागपुर पाटबंधारे विभाग
12 सिकॉम प्रकल्प प्रादेशिक  औद्योगिक विकास महामंडळ, वर्धा
13 निम्न वर्धा नहराचे  कामाकरीता निम्न वर्धा कालवे  विभाग
14 सुकळी तलावाचे बुडीत क्षेत्राकरीता  निम्न वर्धा प्रकल्प
15 मदन तलावाचे बुडीत क्षेत्राकरीता लघु पाटबंधारे विभाग, वर्धा
16 देवळी शाखा कालवासा. क्र. 28830  मी वरुन उगमित मेघापुर उपलघु कालवा क्र. 1च्या पुच्छ नालीचे बांधकामाकरीता निम्न वर्धा कालवे विभाग
1 ) भूधारकास मोबदला वाटप करणे
तपशील स्पष्टीकरण
संबधीत शासन संदर्भ , शासन निर्णय , इतर आदेश , परिपत्रक कोणत्या अधिनियमाचे नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे.
योजनेची थोडक्यात माहिती
भूसंपादन अधिनियम 1894 व भूमी संपादन पुनर्वसन व पुर्नस्थापना करतांना भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हकक अधिनियम 2013 अंतर्गत, तसेच रेल्वे अधिनियम 1989(2008) व राष्ट्रीय राजमार्ग अधिनियम 1956 चे अंतर्गत कार्यालयीन प्रकरणाचे आधारे माहिती.
आवश्यक कादपत्रे 1. भूसंपादन कायदा कलम 4(1) 9(3) (4) 12 (2) यापैकी जी उपलब्ध असेल ती नोटीसची प्रत 37(2) ची नोटीस
2. नोटीस सोबत चालु वर्षातील 7/12 उतारा, आवश्यक, भूधारक हयात नसेल तर मृत्युचा दाखला, वारसांना असल्यास, कोर्ट वारसान प्रमाणपत्र 3. वारसांनचे समंतीपत्र, बधंपत्र इ. कागदपत्रे आवश्यक आहे.
3. भूधारक यांचे ओळखपत्र आणि, बॅक पासबुकची झेरॉक्स
अर्ज कुठे करावा (ऑलाईन/ऑनलाईन) उपजिल्हाधिकारी, भूसंपादन (विपाविम), वर्धा – ऑफलाईन
सदर लिंक
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी 1.सादर केलेल्या मोबदला उचलीचे नोटीसचे अनुषंगाने कार्यालयाकडील घोषीतअंतीम निवाडयामध्ये भूधारकाचे सर्व्हे नं व नाव असणे आवश्यक आहे.
2.संपादनाचे वेळेस असणारे जमीनविषयक कागदपत्रे, व संबधीत भूधारक यांचे ओळखपत्रे, इत्यांची शहानिशा करणे
आवश्यक शुल्क
निर्णय घेणारे अधिकारी उपजिल्हाधिकारी, भूसंपादन (विपाविम), वर्धा
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – 15 दिवस
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://grievances.maharashtra.gov.in
सदर सेवा महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम (RTS) अंतर्गत उपलब्ध आहे किंवा नाही त्याचा तपशिल उपलब्ध नाही.
कार्यालयाचा पत्ता जिल्हाधिकारी, कार्यालय नविन इमारत सिव्हील लाईन वर्धा
संपर्क दुरध्वनी क्रमांक
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी laovidcwardh@gmail.com
2 ) कलम 28 खालील दावे संबधी कार्यवाही
तपशील स्पष्टीकरण
संबधीत शासन संदर्भ , शासन निर्णय, इतर आदेश , परिपत्रक कोणत्या अधिनियमाचे नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे भूसंपादन अधिनियम 1894 व त्याअंतर्गत नियम पुस्तिका, खालील विविध शासन निर्णय. महसुल व वन विभाग शा.नि क्र. संकिर्ण -06/2015/ प्र.क्र.82/अ-2 दिनांक 29.8.2015
आवश्यक कादपत्रे कलम 18 अंतर्गत मा. दिवाणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची छायांकित प्रत. अर्जदार यांनी न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर 90 दिवासाचे आत वाढीव मोबदला प्राप्तीसाठी अर्ज.
योजनेची थोडक्यात माहिती भूमी संपादन अधिनियम 1894 अंतर्गत कलम 18 व 28 अ ची अंमलबजावणी करणे
योजनेमध्ये देण्यात येणारे लाभ संपादीत करण्यात येत असलेल्या शेत जमीनीचा मोबदला वाटप करणे व न्यायालयीन निकाला नुसार भुधारकास वाढीव मोबदला देणे .
अर्ज कुठे करावा (ऑलाईन/ऑनलाईन) उपजिल्हाधिकारी, भूसंपादन (विपाविम, वर्धा) -ऑफलाईन
सदर लिंक
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी 1. न्यायालयाने दिलेल्या निकालाची प्रत. 2. न्यायालयीन निकालापासून विहीत कालावधीत अर्जदार यांनी अर्ज सादर केला आहे काय
आवश्यक शुल्क
निर्णय घेणारे अधिकारी उपजिल्हाधिकारी, भूसंपादन (विपाविम, वर्धा)
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – अर्जदाराचा अर्ज सादर केल्यापासून सहा महिन्याच्या आत निर्णय देणे अनिवार्य.
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://grievances.maharashtra.gov.in
सदर सेवा महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम (RTS) अंतर्गत उपलब्ध आहे किंवा नाही त्याचा तपशिल नाही.
कार्यालयाचा पत्ता जिल्हाधिकारी कार्यालय नवीन इमारत, सिव्हील लाईन, वर्धा
संपर्क दुरध्वनी क्रमांक
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी wardhalaomiw@gmail.com
3 ) भूसंपादन दाखला देणे
तपशील स्पष्टीकरण
संबंचित शासन संदर्भ , शासन निर्णय , इतर आदेश , परिपत्रक कोणत्या अधिनियमाचे नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे/td> भूसंपादन अधिनियम 1894 व भूमी संपादन पुनर्वसन व पुर्नस्थापना करतांना भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हकक अधिनियम 2013 अंतर्गत कार्यालयामधील उपलब्ध भूसंपादन निवाडयाचे आधारे .
आवश्यक कादपत्रे संबंधीत भूधारक यांचे जमीनी विषयीची कागदपत्रे, जसे की सात बारा उतारा, संपादनाबाबतची नोटीस.
योजनेची थोडक्यात माहिती जमीन संपादीत व्यक्तीना
योजनेमध्ये देण्यात येणारे लाभ संपादीत करण्यात येत असलेल्या शेत जमीनीचा मोबदला वाटप करणे व न्ययालयीन निकालानुसार भूधारकास वाढीव मोबदला देणे
अर्ज कुठे करावा (ऑलाईन/ऑनलाईन) उपजिल्हाधिकारी, भूसंपादन (विपाविम), वर्धा -ऑफलाईन
सदर लिंक
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी कार्यालयाकडील घोषीत निवाडयाचे आधारे तपासणी करुन.
आवश्यक शुल्क
निर्णय घेणारे अधिकारी उपजिल्हाधिकारी, भूसंपादन (विपाविम), वर्धा
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – अर्जदाराचा अर्ज सादर केल्यापासुन 15 दिवस
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://grievances.maharashtra.gov.in
सदर सेवा महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम (RTS) अंतर्गत उपलब्ध आहे किंवा नाही त्याचा तपशिल उपलब्ध नाही.
कार्यालयाचा पत्ता जिल्हाधिकारी कार्यालय नवीन इमारत, सिव्हील लाईन, वर्धा
संपर्क दुरध्वनी क्रमांक
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी laovidcwardh@gmail.com
4 ) भूसंपादन नाहरकत दाखला देणे
तपशील स्पष्टीकरण
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे )
योजनेची थोडक्यात माहिती / लाभ
भूसंपादन अधिनियम 1894 व भूमी संपादन पुनर्वसन व पुर्नस्थापना करतांना भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हकक अधिनियम 2013 अंतर्गत तसेच रेल्वे अधिनियम 1989(2008) व राष्ट्रीय राजमार्ग अधिनियम 1956 चे अंतर्गत कार्यालयीन प्रकरणाचे आधारे माहिती.
आवश्यक कादपत्रे 1. लेखी स्वरुपातील अर्ज
2. अर्जासोबत चालु वर्षातील 7/12 उतारा, आवश्यक असल्यास संबंधीताचे जनरल मुखत्यार पत्र, 8 अ उतारा इ.
3. भूसंपादन कायदा कलम 4(1) 9(3) (4) 12 (2) यापैकी जी उपलब्ध असेल ती नोटीसची प्रत
अर्ज कुठे करावा (ऑलाईन/ऑनलाईन) उपजिल्हाधिकारी, भूसंपादन (विपाविम), वर्धा ऑफलाईन
सदर लिंक
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी 1. विहीत नमुन्यातील अजा्रबरोबरच प्राप्त झालेल्या चालु 7/12 उतारा पाहून सदर अताऱ्यावर भूसंपादनाबाबतची नोंद आहे किंवा कसे याबाबत खात्री करणे.
2.कार्यालयीन घोषित निवाडयाचे आधारे खात्री करुन सदरचे सर्व्हे क्रमांक संपादनात आहे किंवा कसे याबतचे नाहरकत प्रमाणपत्र देण्यात येते.
आवश्यक शुल्क
निर्णय घेणारे अधिकारी उपजिल्हाधिकारी, भूसंपादन (विपाविम), वर्धा
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – 30 दिवस
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://grievances.maharashtra.gov.in
सदर सेवा महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम (RTS) अंतर्गत उपलब्ध आहे किंवा नाही त्याचा तपशिल नाही.
कार्यालयाचा पत्ता जिल्हाधिकारी कार्यालय नवीन इमारत, सिव्हील लाईन, वर्धा
संपर्क दुरध्वनी क्रमांक
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी laovidcwardh@gmail.com