महसूल विभागामार्फत प्राप्त होणाऱ्या बांधकाम परवानगी प्रकरण ,भूखंड विभाजन,भूखंड एकत्रीकरण प्रस्तावांची तात्रिक छाननी करणे
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | १) मालकी हक्काची कागदपत्रे ,७/१२ उतारा ,विक्रीपत्र २) मंजुर अभिन्यास नकाशाची छायाप्रत ३) अकृषक आदेशाची छायाप्रत ४) परवाना प्राप्त अभियंता / वास्तुविशारद यांनी तयार केलेल्या नकाशाच्या ४ प्रती. ५) जुन्या व नवीन सर्वे क्रमांकात बदल असल्यास भूमिअभिलेख कार्यालयाकडून जुन्या व नवीन सर्वे नंबर बाबतचा दाखला. |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | १) महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम ,१९६६ २) दिनांक ३/१२/२०२० रोजी संपूर्ण महाराष्ट्रासाठी मंजूर झालेली एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (UDCPR-2020) ३) कामगार उपकर,शासन निर्णय,उधोग,उर्जा व कामगार विभाग ,बीसीए २००९/प्र.क्र,१०८/ कामगार ७-अ दिनांक १७/०६/२०१० |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | १) छाननी शुल्काचा भरणा अ- बांधकाम परवानगी प्रकरण =रु २*बांधकाम क्षेत ब – भूखंड विभाजन /भूखंड एकत्रीकरण =रु ५००/- २) अर्जदाराकडून प्राप्त अर्जाची व अभियंत्याकडून /वास्तुविशारदाकडून विहित नमुन्यात दिलेल्या प्रमाणपत्राची छाननी ३) प्रस्तावासोबत सलग्न केलेल्या कागदपत्रांची तपासणी ४) दि ०३/१२/2020 रोजी मंजूर झालेल्या एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील तरतुदीच्या अनुषंगाने प्राप्त नकाशाची तांत्रिक तपासणी करणे . ५) बांधकाम प्रस्ताव योग्य असल्यास महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम ,१९६६ च्या कलम १२४ (ब) अंतर्गत विकास शुल्काचा व अधिमुल्य शुल्काचा भरणा चालानी द्वारे शासन जमा करणे व कामगार उपकर खाते क्र.004220110000153 येथे चालान द्वारे भरणा करणे . ६) नियमाप्रमाणे योग्य असलेले बांधकाम नकाशे मंजुरीची शिफारस करून महसूल विभागाकडे पाठविणे |
ऑनलाईन सुविधा आहे का – | प्रस्तावित आहे |
असल्यास सदर लिंक – | — |
आवश्यक शुल्क | १)छाननी शुल्क अ- बांधकाम परवानगी प्रकरण =रु २*बांधकाम क्षेत्रफळ चौ.मी. /- ब – भूखंड विभाजन /भूखंड एकत्रीकरण =रु ५००/- २)विकास शुल्क ,अधिमुल्य,labour cess MRTP ACT व UDCPR मधील तरतुदीनुसार |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | चालान द्वारे |
निर्णय घेणारे अधिकारी – | सहाय्यक संचालक नगर रचना /उपविभागीय अधिकारी |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | ६० दिवस |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | townplanner1wardha@rediffmail.com |
कार्यालयाचा पत्ता | जिल्हा क्रीडा संकुल, आंबेडकर चौक,सिविल लाईन्स,वर्धा -४४२००१ |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | ०७१५२-२४२६३९ |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | townplanner1wardha@rediffmail.com |