सहकारी गृहनिर्माण संस्थांचे मानीव अभिहस्तांतरण करणे.
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | मानीव अभिहस्तांतरणासाठी करावयाच्या ऑनलाईन व ऑफलाईन (Hard Copy) अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे :- 1) ऑनलाईन (Online) अर्जासोबत अपलोड (Upload) करावयाची कागदपत्रे 1) मानवी अभिहस्तांतरणाकरिता नमुना 7 मधील अर्ज. (परिशि ष्ट-1 प्रमाणे) 2) सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणी प्रमाणपत्र/कंपनी नोंदणी प्रमाणपत्र/डीड ऑफ डिक्लेरेशनची प्रत. 3) अर्जदार संस्थेचा तपशील व संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा/विशेष सर्वसाधारण सभांमध्ये मानीव अभिहस्तांतरण करण्यासंदर्भात केलेल्या ठरावाची प्रत. 4) मिळकत पत्रिकाचा तीन महिन्याच्या आतील उतारा. (मालमत्ता पत्रक 7/12 उतारा इ.) 5) संस्थेतील सर्व कायदेशीर सदनिका धारकांची विहित नमुन्यातील यादी. 6) सहकारी गृहनिर्माण संस्थेने मानवी अभिहस्तांतरण करुन देण्यासाठी महाराष्ट्र वेश्म अधिनियम, 1970 अन्वये प्रवर्तकाला बजावलेली कायदेशीर नोटीस. 7) नियोजन/सक्षम प्राधिकरणाने दिलेले बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र तसेच भोगवटा प्रमाणपत्र. 8) सबंधित संस्थेकडे भोगवटा प्रमाणपत्र नसल्यास इमारतीचा प्रत्यक्ष ताबा घेण्यात आल्याचे तसेच सदर इमारतीच्या संदर्भात असलेल्या सर्व जबाबदा-या/दायित्वे स्किारण्यास तयार असल्याचे तसेच मानीव अभिहस्तांतरण झाल्यानंतर सबंधीत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेकडे भोगवटा प्रमाणपत्रासाठी अर्ज करणार असल्याबाबत स्व-प्रमाणपत्र घेण्यात यावे. (परिशिष्ट-5 प्रमाणे) 9) रु. 2000/- ची कोर्ट फी स्टॅम्प किंवा ऑनलाईन फी 10) संस्थेची कागदपत्रे खरी असल्याबाबत अर्जदाराचे स्वप्रतिज्ञापत्र (परिशिष्ट-4 प्रमाणे) 2) ऑफलाईन अर्जासोबत (Hard Copy) जोडावयाची कागदपत्रे :- 1) मानवी अभिहस्तांतरणाकरिता नमुना 7 मधील अर्ज (वर नमुद केल्याप्रमाणे मुद्रांक शुल्कासह) 2) मानीव अभिहस्तांतरण क्रमांक (D.C.No.) प्राप्त झाल्यास नमुना क्र.7 ची प्रत 3) संस्थेतील एका सभासदाच्या सदनिकेच्या विक्री करारनाम्याची प्रत व इंडेक्स 2 किंवा सदनिकेच्या मालकी हक्काचा पुराव जसे वारस प्रमाणपत्र, न्यायालयाचा हुकुमनामा किंवा मृत्यूपत्र इत्यादी. 4) विकासकाने मंजुर करुन घेतलेल्या रेखांकन (Layout) ची सक्षम प्राधिकरणाकडील अंतिम मंजुर नकाशा प्रत. |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिकांबाबत (त्या बांधण्यास प्रोत्साहन देणे, त्याची विक्री, व्यवस्थापन व हस्तांतरण यांचे नियमन करण्याबाबत) अधिनियम 1963, नियम 1964 व महाराष्ट्र शासन, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, शासन निर्णय क्रमांक सगृयो-2017/प्र.क्र.192/14-स, दिनांक 22 जुन, 2018 |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | अधिनियम, नियम व शासन निर्णयानुसार आवश्यक असलेल्या कागदपत्राची छाननी करणे. |
ऑनलाईन सुविधा आहे का – | होय |
असल्यास सदर लिंक – | https;//aaplesarkar.mahaonline.gov.in/en |
आवश्यक शुल्क | 2000/- |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | कोर्ट फी स्टॅम्प किंवा ऑनलाईन फी |
निर्णय घेणारे अधिकारी – | जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | 6 महिने |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | — |
कार्यालयाचा पत्ता | जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वर्धा यांचे कार्यालय,केशरीमल शाळेसमोर, सुदामपुरी, वर्धा. |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | (07152)255756 |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | ddr_wda@rediffmail.com |