सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
विभागाची माहिती | |
---|---|
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा अंतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती ,वर्धा हे कार्यालय दिनांक 21/11/2016 पासुन कार्यांन्वीत झालेले आहे. कार्यालयाची रचना अध्यक्ष तथा अतिरीक्त जिल्हाधिकारी निवडश्रेणी श्री .दत्तप्रसाद ज्ञ.नडे ,उपायुक्त तथा सदस्य श्री मंगेश वानखडे व संशोधन अधिकरी श्री.अंकेश केदार अशी समितीची रचना आहे.समितीकडे शैक्षणीक ,शासकीय सेवा व निवडणुक विषयक प्रकरणे तपासुन जात वैधता प्रमाणपत्र प्रदान केले जाते .या समितीकडे सन 2024-25 या कालावधीमध्ये 7761 प्रकरणे प्राप्त झाले असुन 7034 इतक्या प्रकरणात जात वैधता प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलेली आहे.समिती वेळोवेळी शाळा कॅालेजेस मध्ये जावुन विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी बाबत आवश्यक कागदपत्राबाबत मार्गदर्शन व शिबीर आयोजित केले जातात तसेच जात प्रमाणपत्रासंबंधी असलेले सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे वोळोवेळी प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबीर आयोजित केली जातात . |
![]() श्री.डॉ.मंगेश वानखडे,उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती |
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे/ नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे. | महाराष्ट्र अनुसुचित जाती ,अनुसुचित जमाती ,विमुक्त जाती भटक्या जमाती ,इतर मागासपवर्ग व विशेस मागास प्रवर्ग ( जातीचे प्रमाणपत्र देण्या चे व त्याच्या पडताळणीचे विनियमन ) अधिनीयम 2000 व नियम 2012 मधिल तरतुदीच्या अनुषंगाने जात पडताळणी समितीमध्ये कामकाज करीत आहे. |
योजनेची थोडक्यात माहिती | या कार्यालयामध्ये शैक्षणीक ,सेवा व निवडणुक विषयक जात प्रमाणपत्रांची पडताळणी नियमानुसार केली जाते. |
योजने मध्ये देण्यात येणारे लाभ | भारतीय संविधानाने दिलेले मागासवर्गीयांना आरक्षणाचे लाभ घेण्याकरीता जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे. ते विहीत मुदतीत तपासुन दिले जातात. |
आवश्यक कादपत्रे | 1).विहीत नमुन्यातील ऑनलाईन अर्ज 2). संबंधीत शाळा /महविद्यालय यांचे कव्हरिंग पत्र 3.)विद्यार्थ्या शिकत असलेल्या शाळा /कॉलेजयांचे बोनाफाईट प्रमाणपत्र 4)अर्जदाराचे सक्षम अधिकारी यांनी दिलेले जात प्रमाणपत्र 5)अर्जदाराची 4 था वर्ग व 10 वा वर्गाची टीसी 6)अर्जदाराच्या वडीलांची 4 था वर्ग व 10 वा वर्गाची टीसी 7) अर्जदाराच्या आजोबांच्या 4 था वर्ग व 10 वा वर्गाची टीसी 8) अर्जदार त्यांचे वडील किंवा त्यांचे नातेवाईकांचा त्यांच्याबाबतचा जन्म नोंदीतील उतारा 9) मानिव दिनांक अनुसुचित जाती करीता 10 ऑगस्ट 1950 विमुक्त जाती भटक्या जमाती करीता 21 नोव्हेबर 1961 ,इतर मागासप्रवर्गा व विशेष मागासप्रवर्ग व आर्थीक व सामाजिक दृष्ट्या मागासप्रवर्ग यांचे करीता 13 ऑक्टोंबर 1967 पुर्वीचे जात नमुद असलेले व कायमा वास्तव्य असलेले लेखी पुरावे . 10) महसुली अभिलेख किंवा ग्रामपंचायत अभिलेख उपलब्ध असल्यास आणी इतर संबंधत लेखी पुरावे सादर करावे . |
अर्ज कुठे करावा (ऑलाईन/ऑनलाईन) | https://barti.maharashtra.gov.in/ |
सदर लिंक | — |
आवश्यक शुल्क | विद्यार्थ्यांकरीता 100 रु , सेवा व निवडणुकी करीता 500 रु |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | किमान 3 महिने कालावधी |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | http://barti.maharashtra.gov.in |
कार्यालयाचा पत्ता | जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती ,वर्धा डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सेवाग्राम रेल्वे स्टेशन रोड ,लक्ष्मी नगर ,वर्धा पीन 442001 |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | 07152-251777 |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | dcvcwardha@gmail.com |