बंद

15 वा वित्त आयोग अंतर्गत प्राप्त अनुदानाच्या अनुषंगाने दयावयाच्या प्रशासकीय मान्यते बाबत करावयाची कार्यवाही

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे 1.   नगरपरिषदेकडून सदर विषयाबाबतचा प्रस्ताव.
2.   प्रस्तावित कामे ही 15 व्या वित्त अयोगाअंतर्गत अनुज्ञेय असलेल्या कामापैकीच असावीत.
3.   नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेने सर्वसाधारण सभेच्या ठरावान्वये संबंधीत कामाची केलेली शिफारस
4.   सदर कामांना सक्षम प्राधिकाऱ्याची तांत्रिक मंजुरी
5.   ज्या प्रस्तावात बांधकामे अंतर्भुत आहेत अशा कामांच्या बाबतीत प्रस्तावीत बांधकामाखालील जमिनीची मालकी संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्थेची
असल्याबाबतचे अधिकार अभिलेख सादर करणे अनिवार्य.
6.   सदर प्रस्तावातील बांधकाम ही शहराच्या विकास आराखडयाशी सुसंगत आहेत किंवा कसे याबाबतचे नगररचना कार्यालयाचे प्रमाणपत्र
7.   अग्निशमन वाहने/उपकरणे व इतर अग्निशमन यंत्रसामुग्री खरेदी करतांना संचालक अग्निशमन सेवा यांची तांत्रिक मान्यता.

संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्र.एफएफसी2020/प्र.क्र 56/नवि-4 दि. 28 ऑक्टोबर 2020

निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी मुद्या क्र.2 मधील नमुद आवश्यक कागदपत्रांची छाननी करुन 13 वा वित्त आयोग अंतर्गत प्राप्त अनुदानाच्या अनुषंगाने प्रशासकीय मान्यतेबाबत कार्यवाही करणेत येते.
ऑनलाईन सुविधा आहे का – नाही
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क

शुल्क असल्यास भरण्याची पद्धत

निर्णय घेणारे अधिकारी – जिल्हाधिकारी वर्धा
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – 15 दिवस

ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://grievances.maharashtra.gov.in
कार्यालयाचा पत्ता जिल्हा सह आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा
संपर्क दुरध्वनी क्रमांक 7152 – 250030

संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी mawardha99@gmail.com