शेत जमिनीस रहिवास,औद्योगिक व वाणिज्य वापर यास्तव अकृषिक करण्यासाठी महसूल विभागाकडून प्राप्त प्रस्तावांची छाननी करणे
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | १) मालकी हक्काची कागदपत्रे ,७/१२ उतारा ,विक्रीपत्र २) पटवारी नकाशाची मूळ प्रत. ३) मोजणी नकाशाची मुळ प्रत. ४) परवाना प्राप्त अभियंता / वास्तुविशारद यांनी तयार केलेल्या अभिन्यास नकाशाच्या ४ प्रती. ५) जुन्या व नवीन सर्वे क्रमांकात बदल असल्यास भूमिअभिलेख कार्यालयाकडून जुन्या व नवीन सर्वे नंबर बाबतचा दाखला. ६ ) विस्तृत गाव नकाशाची प्रत. ७) अभिन्यासाखालील जागेस अधिकृत पोचरस्ता उपलब्ध असल्याबाबतचा अधिकृत दस्ताऐवज. |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | १) महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम ,१९६६ २) दिनांक ३/१२/२०२० रोजी संपूर्ण महाराष्ट्रासाठी मंजूर झालेली एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (UDCPR-2020) |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | १) छाननी शुल्काचा भरणा अ- रु ५००/- प्रती ४००० चौ.मी. २) अर्जदाराकडून प्राप्त अर्जाची व अभियंत्याकडून /वास्तुविशारदाकडून विहित नमुन्यात दिलेल्या प्रमाणपत्राची छाननी ३) प्रस्तावासोबत सलग्न केलेल्या कागदपत्रांची तपासणी ४) दि ०३/१२/2020 रोजी मंजूर झालेल्या एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील तरतुदीच्या अनुषंगाने प्राप्त नकाशाची तांत्रिक तपासणी करणे ५) महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम ,१९६६ च्या कलम १२४ (ब) अंतर्गत विकास शुल्क व लागू असल्यास अधिमुल्य शुल्काचा भरणा चालान द्वारे शासन जमा करणे. ६ ) प्रस्ताव योग्य असल्यास भूमिअभिलेख कार्यालयाकडून सदर अभिन्यासाची मोजणी करण्यासाठी सिमांकनाची शिफारस करणे . ७)सिमांकित नकाशानुसार अंतिम मंजुरीस्तव प्राप्त झालेल्या प्रकरणात महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम ,१९६६ च्या कलम १२४ (ब) अंतर्गत विकास शुल्काचा भरणा शासन जमा चालान द्वारे करून अंतिम मंजुरीची शिफारस करणे |
ऑनलाईन सुविधा आहे का – | आहे |
असल्यास सदर लिंक – | https://dtp.maharashtra.gov.in/e-services |
आवश्यक शुल्क | १) विकास शुल्क = ०.५%*जमिनीचे क्षेत्रफळ चौ .मी. मध्ये.* वार्षिक मुल्यदर तक्त्यानुसार सदर जमिनीचा दर २ ) अधिमुल्य शुल्क =१५%*जमिनीचे क्षेत्रफळ * वार्षिक मुल्यदर तक्त्यानुसार सदर जमिनीचा दर (ग्रामीण व परीघस्त नकाशे क्षेत्र ) ३ ) अधिमुल्य शुल्क =५%*जमिनीचे क्षेत्रफळ* वार्षिक मुल्यदर तक्त्यानुसार सदर जमिनीचा दर (नगर पंचायत क्षेत्र ) |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | चालान द्वारे |
निर्णय घेणारे अधिकारी – | सहाय्यक संचालक नगर रचना /संबंधित महसूल अधिकारी |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | ६० दिवस |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | townplanner1wardha@rediffmail.com |
कार्यालयाचा पत्ता | जिल्हा क्रीडा संकुल, आंबेडकर चौक,सिविल लाईन्स,वर्धा -४४२००१ |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | ०७१५२-२४२६३९ |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | townplanner1wardha@rediffmail.com |