आम आदमी विमा योजना
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | 1.सदस्य नोंदणी विहीत नमुन्यातील अर्ज व त्यावर तलाठी यांची स्वाक्षरी 2.तलाठी यांचेकडील 7/12 3.राष्ट्रीयकृत बँकेचे खाते पुस्तकाची झेरॉक्स 4.शिष्यवृत्ती विहित नमुन्यातील फॉर्म व त्यावर मुख्याध्यापक यांची स्वाक्षरी. |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग शासन निर्णय आआवि 2007/प्र.क्र. 356, विसयो-2 दिनांक 16 ऑक्टोबर 2007.सदर योजना ही 1 सप्टेंबर 2013 पासुन ऑन लाईन करण्यात आलेली आहे. व शासनाने वेळोवेळी ठरवुन दिलेली मार्गदर्शक तत्वे. |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | लाभार्थ्याने विहित नमुन्यात अर्ज भरुन त्यावर तलाठी यांची स्वाक्षरी घेऊन सदर अर्ज हा महा ई सेवा केंद्रात जाऊन ऑन लाईन करुन त्याची पोहोच घ्यावयाची आहे. विद्यार्थ्याने शिष्यवृतीचा अर्ज भरुन त्यावर मुख्याध्यापक यांची स्वाक्षरी घेऊन सदर अर्ज हा महा ई सेवा केंद्रात जाऊन ऑन लाईन करुन त्याची पोहोच घ्यावयाची आहे. |
ऑनलाईन सुविधा आहे का – | होय |
असल्यास सदर लिंक – | https://aaplesarkar.maharashtra.gov.in/ |
आवश्यक शुल्क | सदस्य नोंदणी फी व शिष्यवृत्ती नोंदणी फी प्रत्येकी रुपये 22.50 पैसे |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | अर्ज दाखल करते वेळी ऑनलाईन व्दारे. |
निर्णय घेणारे अधिकारी – | एल.आय.सी ऑफ इंडिया |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | सदस्याचा आयडी मिळणेसाठी दोन महिने, शिष्यवृत्ती मंजुरीसाठी दोन महिने. |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | https://sjsa.maharashtra.gov.in |
कार्यालयाचा पत्ता | जिल्हाधिकारी कार्यालय / तहसिल कार्यालय / तलाठी कार्यालय |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | — |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | sgywardha@gmail.com |