बंद

हिंदी विद्यापीठात 21 जून रोजी जागतिक योग दिनाचे आयोजन

18/06/2022 - 22/06/2022

हिंदी विद्यापीठात 21 जून रोजी जागतिक योग दिनाचे आयोजन

27 जूनपर्यंत योग सप्ताह होणार साजरा
वर्धा, 17 जून 2022 : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात विश्व योग दिनानिमित्त 21 जून रोजी सकाळी 6.00 वाजता विद्यापीठाच्या अटलबिहारी वाजपेयी भवन येथे योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार योग दिन कार्यक्रमांतर्गत, स्वागत आणि इतर केंद्रीय कार्यक्रम सकाळी 6 ते 6.40 या वेळेत आयोजित केले जातील. 6.40 ते 7 या वेळेत आभासी माध्यमातून पंतप्रधान मार्गदर्शन करतील. सकाळी 7 ते 7.45 या वेळेत विद्यापीठातील कर्मचारी व विद्यार्थ्यांना सामान्य योग प्रोटोकॉल अंतर्गत योग तज्ञ, योगशास्त्र, योग संस्कार संस्था, नागपूरचे मुकुल गुरु यांच्या मार्फत विविध प्रकारचे योगासन व प्राणायाम केले जातील.