खनिकर्म विभाग
| विभागाची माहिती | |
|---|---|
| खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा  गौणखनिज हे कोणत्याही बांधकामाचा मुख्य कणा असल्यामुळे कोणत्याही राष्ट्राच्या औदयोगीक पायाभुत सुविधांच्या विकासासाठी महत्वाची भुमिका बजावते तसेच शासनाच्या महसुल वसुलीमध्ये महत्वाचा स्त्रोत असल्याची भुमिका बजावते. त्यामुळे खनिज हे राज्यांचा खजिना असल्याचे ओळखले जाते व त्यानुसार खनिजांवर देखरेख ठेवणे व त्यांच्या निष्काशनाबाबत राज्यात प्रचलित नियमावली व शासन निर्णय जारी केले जातात. त्यानुसार महाराष्ट्र राज्यासाठी खान व खनिज (विकास व विनियमन) अधिनियम 1957 च्या आधारे महाराष्ट्र गौण खनिज उत्खन्न (विकास व विनियमन) नियम 2013 जारी केलेला आहे. त्यानुसार तसेच गौण खनिज संबधित आणि इतर प्रचलित शासन निर्णयानूसार वर्धा जिल्हयात आढळुन येणा-या गौण खनिजाच्या निष्काशनाबाबत कार्यवाही केली जाते.  | 
![]() श्री श्रीकांत शेळके,जिल्हा खनिकर्म अधिकारी  | 
| तपशील | स्पष्टीकरण | 
|---|---|
| संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे/ नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे. | 1. महाराष्ट्र गौण खनिज उत्खन्न (विकास व विनियमन) नियम 2013 2. सुधारीत वाळू निर्गती धोरण शासन निर्णय, दिनांक  | 
| योजनेची थोडक्यात माहिती | 1. दिर्घ मुदतीचा खाणपट्टा 2. अल्प मुदतीचा तात्पुरता खाणपरवाना 3. गौणखनिजाचा साठा व विक्री व्यापारी परवाना. 4. वाळू घाट लिलाव. 5. शासकीय जमिनीवरील खणिपट्टयांचा ई लिलाव  | 
| योजने मध्ये देण्यात येणारे लाभ | उपरोक्तप्रमाणे | 
| आवश्यक कादपत्रे | 1. दिर्घ मुदतीचा खाणपट्टा I. महाराष्ट्र गौण खनिज उत्खन्न (विकास व विनियमन) नियम 2013 मधील नमुना-ख मध्ये अर्ज. II. ज्या क्षेत्रासाठी अर्ज केला असेल त्यासाठीचे हक्काचे अभिलेख- 7/12 III. क्षेत्राचे स्थान दाखविणारा नकाशा – मोजणी शीट ‘क’ प्रत IV. शासनाचे कुठलेही देय नसल्याचे स्वयं-घोषणापत्र/ ना-देय प्रमाणपत्र V. जागेचा चतुर्सिमा नकाशा. VI. अर्जदाराचे पॅन कार्ड VII. वित्तीय प्राप्तीकर विवरणपत्र – (ITR) VIII. आधार कार्ड IX. संबंधित विभागाची ना हरकत 2. अल्प मुदतीचा तात्पुरता खाणपरवाना- I. महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन(विकास व विनियमन) नियम 2013 मधील नमुना-त मध्ये अर्ज. II. ज्या क्षेत्रासाठी अर्ज केला असेल त्यासाठीचे हक्काचे अभिलेख- 7/12. III. उत्खनन करावयाचे क्षेत्र जिल्हा खाणकाम योजने मध्ये समाविष्ट असलेबाबतचे कागदपत्र IV. क्षेत्राचे स्थान दाखविणारा नकाशा – मोजणी शीट ‘क’ प्रत. V. अर्जदाराचे पॅन कार्ड. VI. अर्जदाराचे आधार कार्ड. 3. गौणखनिजाचा साठा व विक्री व्यापारी परवाना. I. महाराष्ट्र गौण खनिज उत्खन्न (विकास व विनियमन) नियम 2013 मधील नमुना-ध मध्ये अर्ज. II. ज्या क्षेत्रासाठी अर्ज केला असेल त्यासाठीचे हक्काचे अभिलेख- 7/12. III. क्षेत्राचे स्थान दाखविणारा नकाशा – मोजणी शीट ‘क’ प्रत. IV. अर्जदाराचे पॅन कार्ड. V. अर्जदाराचे आधार कार्ड. VI. अकृषक आदेश व नकाशा. VII. क्रशर असल्यास प्रदुषण नियंत्रण बोर्डाचे प्रमाणपत्र VIII. वित्तीय प्राप्तीकर विवरणपत्र (ITR 4. वाळू घाट ई लिलाव 1. ई लिलाव जाहिरातीमध्ये दिलेल्या पात्रता पूर्ण करणे. 5. शासकीय जागेवरील खणिपट्टयांचा ई लिलाव 1. ई लिलाव जाहिरातीमध्ये दिलेल्या पात्रता पूर्ण करणे.  | 
| अर्ज कुठे करावा (ऑलाईन/ऑनलाईन) | महाखनिज या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज. | 
| सदर लिंक | https://mahakhanij.maharashtra.gov.in | 
| आवश्यक शुल्क | 01. दिर्घ मुदतीचा खाणपट्टा 520/- 02- तात्पुरता परवाना- 1020/- (500 ब्रास पर्यत) 2020/- (2000 ब्रास पर्यत) 5020/- (2001 ब्रासच्या पुढे)  | 
| निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | सर्व कागदपत्रांच्या पुर्ततेच्या अधिन | 
| ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | https://grievances.maharashtra.gov.in | 
| कार्यालयाचा पत्ता | खनिकर्म शाखा, पहिला माळा, जिल्हाधिकारी कार्यालय, सिव्हिल लाईन्स, सेवाग्राम रोड, वर्धा 442 001  | 
| संपर्क दुरध्वनी क्रमांक | 07152-243446 | 
| संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | miningofficerwardha@gmail.com | 
                        
                        
                            
            