मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | १) प्राप्त अर्ज २) ७/१२ उतारा ३) आधार कार्ड ४) मागासवर्गिय जाती / मागासवर्गिय जमातीचे प्रमाणपत्र ५) सामायिक शेती असल्यास इतर भागीदाराचे नाहरकत प्रमाणपत्र ६) पाणी प्रभावीत क्षेत्र असल्यास संबंधित खात्याच्या नाहरकत दाखला ७) कालवा /नदी येथून पाणी उपसा करण्याकरीता संबंधीत खात्याचे नाहरकत प्रमाणपत्र |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | १) शासन निर्णय क्रमांक :- सौरप्र – २०१८/प्र.क्र. ४०१/उर्जा -७ दि. १५.११.२०१८ २) शासन निर्णय क्रमांक :- सौरप्र – २०१८/प्र.क्र. ४०१/उर्जा -७ दि. ०१.०१.२०१९ ३) शासन निर्णय क्रमांक :- सौरप्र – २०१९/प्र.क्र. १५९ /उर्जा -७ दि. ११.०९.२०१९ |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | १) अर्जदाराने सादर केलेल्या अर्जाची पडताळणी करणे. २) अर्जदाराच्या शेतीचे क्षेत्र ३ /५/७.५ HP सौर कृषीपंप निश्चितीकरीता पडताळणी करणे. ३) अर्जदाराने जोडलेल्या सातबारा उताऱ्याची पडताळणी करणे ४) अर्जदाराने जोडलेल्या आधार कार्ड ची पडताळणी करणे. ५) अर्जदाराची शेती सामाईक / स्वत:च्या मालकीची असल्याबददल शहानिशा करणे. ६) अर्जदाराच्या शेतीमध्ये पाण्याचा स्तोत्र उपलब्ध असल्याबाबतची शहानिशा करणे. ७) अर्जदाराची शेती पाणी प्रभावीत क्षेत्रामध्ये येत नसल्याची शहानिशा करणे. |
ऑनलाईन सुविधा आहे का – | आहे |
असल्यास सदर लिंक – | इथे क्लिक करा |
आवश्यक शुल्क | For 3 HP:-16560/-.5 HP:-24710/- 7.5 HP:-33455/- For General category For 3 HP:-8280/-.5 HP:-12355/- 7.5 HP:-16728/- For SC/ST category |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | OFFLINE/ONLINE |
निर्णय घेणारे अधिकारी – | अधिक्षक अभियंता महावितरण वर्धा |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | अंदाजे एक आठवडा |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | Website:- www.mahadiscom.in E-mail:- agsolar_support.mahadiscom.in Tollfree number:- 1800-102-3435,1800-233-3435 Mahavitaran consumer App |
कार्यालयाचा पत्ता | अधिक्षक अभियंता यांचे कार्यालय, महावितरण, वर्धा |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | 07152-243039 |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | sewardha@mahadiscom.in, wardhase@gmail.com |