बंद

आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे 1) मुळ अर्जासह दोन झेरॉक्स प्रतीत अर्ज सादर करावा (एकूण तीन प्रतीत)
2) सलग सेवा 30 वर्षाचे नियुक्ती पत्रे, सेवा समाप्तीचे आदेश, मानधन किंवा वेतनाचे पुरावे
3) अनुभवाचा पुरावा ज्या ज्या माध्यमात काम केले आहे तेथील नियुक्ती आदेश
4) माध्यमामध्ये काम करताना मिळालेल्या वेतनाचा / मानधनाचा पुरावा
5) अंशदायी भविष्य निर्वाह निधी (EPFO)निवृत्तीवेतन PPOआदेशाची प्रत
6) अधिस्वीकृती पत्रिका मिळाल्याची दिनांक व झेरॉक्स प्रत
7) यापुर्वी अधिस्वीकृती पत्रिका असल्यास त्याची झेरॉक्स प्रव व ती केव्हा मिळाली आणि उत्पनाचा दाखल्याची मुळ प्रत (सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेला ) शेवटच्या तीन आर्थिक वर्षाचे
8) पॅनकार्डची साक्षांकित प्रत
9) अर्ज करण्याच्या तारखेच्या अगोदरचे शेवटच्या तीन आर्थिक वर्षाच्या ITR (Income Tax Return) विवरणपत्राच्या साक्षांकित प्रती .
10) अर्जातील माहिती खरी असल्याबाबत आणि अर्जदार आयकर भरत नसल्यास तसेच अर्जदारास गंभीर गुन्हयामध्ये दोषसिध्दी होऊन शिक्षा झाली नसल्सास तसे 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र सोबत जोडावे (ॲपिट्युड / नोटराईज केलेला )
11) किमान 60 वर्ष वय पूर्ण –जन्मतारखेचा पुरावा म्हणून आवश्यक प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत (शाळा सोडल्याचा दाखला किंवा अन्य पुरावा)
12) शैक्षणिक अर्हतेच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत
13) आधारकार्डाची साक्षांकित प्रत
14) बँकेतील खाते क्रमांक व आयएफसी कोण आणि बँकेचे नाव (खातेपुस्तिकेच्या पहिल्या पृष्ठाची प्रत)

सूचना:- 1) अर्ज हा सुस्पष्ट अक्षरात भरलेला असावा किंवा टाईप केलेला असावा.
2) सर्व साक्षांकित झेरॉक्स प्रती स्पष्ट दिसणारी असावी.

संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे )

  • शासन निर्णय क्र.मावज-2013/प्र.क्र.195/का-34/दिनांक 2 फेब्रुवारी 2019
  • निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी महासंचालक, माहिती व जनसंपर्क तथा अध्यक्ष , आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना समिती, मुंबई-32

    ऑनलाईन सुविधा आहे का –
    असल्यास सदर लिंक –
    आवश्यक शुल्क अधिस्वीकृती अर्ज 50/-
    शुल्क असल्यास भरण्याची पद्धत शासकीय चलान
    निर्णय घेणारे अधिकारी – मा.महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय मुंबई-32

    निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – २ महिने
    ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://grievances.maharashtra.gov.in/mr
    कार्यालयाचा पत्ता जिल्हा माहिती कार्यालय, प्रशासकीय इमारत दुसरा माळा, वर्धा

    संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152 /243820

    संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी diowardha@gmail.com Website www.dgipr.maharashtra.gov.in mumbai