बंद

सराईत अपराधी व अपराधी परिविक्षा योजना

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे 1. मुक्तबंदी / परिविक्षाधीन यांचा व्यवसायासाठी सहाय्यक अनुदान मिळणेकरीता चा विहित नमुन्यातील अर्ज.
2. मुक्तबंदी ज्या कारागृहातून मुक्त झाला त्या कारागृहाचे मुक्तता प्रमाणपत्र.
3. व्यवसायासाठी आवश्यक असलेली पूरवठा धारकाकडून प्राप्त करुन घेतलेली तिन दरपत्रके.
( उदा. शिवणकाम, चांभारकाम, स्क्रिन प्रिन्टींग, बेकरी, शेतीसाठी पाईप लाईन, चहाची टपरी, स्टेशनरी विक्री, भांडी / कपडे विक्री इत्यादी व्यवसायासाठी. )
4. जनावरांच्या खरेदी करीता कृषी उत्पन्न बाजार समिती चे दरपत्रक असावे. त्यामध्ये दरपत्रकानुसार जनावरे पुरविण्यात येतील असा उल्लेख असावा. जर बाजार समितीचे दरपत्रक नसल्यास बाजार समितीचे ना हरकत असावेत.
( उदा. शेळीपालन, दुग्धव्यवसाय करीता गाय / म्हैस खरेदी इत्यादी व्यवसायासाठी )
5. व्यवसायासाठी मंजूर रक्कमेपेक्षा जादा लागणारी रक्कम अर्जदार स्वत: भरण्यास तयार असल्याचे हमीपत्र असावे.
6. मागणी केलेले आर्थिक सहाय्यक अनुदान ज्या कारणासाठी मागणी केली आहे ते त्याच कारणासाठी खर्च करणार असल्याचे हमीपत्र असावे.
7. मुक्तबंदी / परिविक्षाधीन यांचे रेशन कार्ड / निवडणूक ओळखपत्र / आधार कार्ड असावे.
8. मुक्तबंदी / परिविक्षाधीन यांचे रहिवासी प्रमाणपत्र असावे. ( संरपच / नगरसेवक / तलाठी / पोलीस पाटील / ग्रामसेवक )
9. मुक्तबंदी / परिविक्षाधीन यांचे चारित्र्याबाबतचे प्रमाणपत्र असावे. (संरपच/ नगरसेवक/ तलाठी/ पोलीस पाटील/ ग्रामसेवक)
10. उत्पनाचे प्रमाणपत्र.
11. मुक्तबंदी / परिविक्षाधीन यांचे विहित नमुन्यातील अर्जावर सध्याचा पासपोर्ट साईज फोटो लावलेला असावा.
12. कोणत्याही राष्ट्रीयकृत बॅकेत बचत खाते असलेल्या पासबुकची फोटो असलेली छायांकीत प्रत त्यावर IFSC क्रमांक
असणे अनिवार्य आहे.

संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) १)शासन निर्णय महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग, बाहआ-2013 / प्र.क्र. 9 / का- 9 दिनांक 22 ऑक्टोंबर 2013 व शुध्दीपत्राक दिनांक 21 नोव्हेंबर 2013
2)शासन निर्णय महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग,अपअ-2011 / प्र.क्र. 142 / का- 9 दिनांक 14 ऑक्टोंबर 2016
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी १) अर्जदाराचा अर्ज
२) उपरोक्त प्रमाणे आवश्यक कागदपत्रे

ऑनलाईन सुविधा आहे का –
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत
निर्णय घेणारे अधिकारी – जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्धा

निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – एक महिणा
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक
कार्यालयाचा पत्ता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, वर्धा
डॉ. अनुजा इखार यांची इमारत, हिरो शोरुम जवळ, मोहन नगर, नागपूर रोड,वर्धा

संपर्क दुरध्वनी क्रमांक फोन नंबर 07152 – 242281
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी dwcdowardha@gmail.com