महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेताच्या बांधावर व शेतकऱ्याच्या शेत जमिनीवर वन विभागाच्या सामाजिक वनीकरण शाखेमार्फत वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्याबाबत
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
कार्यपद्धती | माग्ररोह्योसाठी जॉबकार्ड धारक वरील अ ते जे प्रवर्गातील कोणतीही व्यक्ती वैयक्तिक लाभार्थी म्हणून या योजनेचा लाभ घेण्यास पत्र आहे इच्छुक लाभधारकाच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे हि जमीन कुळ कायद्याखाली येत असल्यास व ७/१२ च्या उतार्यावार जर कुळाचे नाव असेल तर योजना कुळाच्या संमतीने राबविण्यात यावी लाभार्थ्यांचे ७/१२ व 8 अ चे उतारे अर्जासोबत जोडावे इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज ग्रामपंचायतीकडे दाखल करावा अर्जाचा नमुना परिशिष्ट क्र.1 आणि संमातीपत्रसाठी करारपत्राचा नमुना परिशिष्ट क्र2 सोबत जोडले आहेत. ग्रामपंचायतीने त्यांचा शिफारसीसह अर्ज वन विभागाच्या सामाजिक वनीकरण शाखेस हंस्तांतरीत करावा. माग्ररोह्यो कार्यपध्दतीप्रमाणे ग्रामपंचायत व ग्रामसभा यांच्या सहकार्याने या योजनेअंतर्गत कोणाला व किती लाभ घेता येईल याबाबत ग्रामसभा घ्यावी. शेतक-यांच्या शेताच्या बांधावर/ शेतामध्ये लागवड करावयाच्या वृक्षलागवडीच्या खर्चाची प्रमाणके रोपाच्या किंमतीसह सोबतच्या नमुना-1 मध्ये आणि जलद गतीने वाढणा-या प्रजांतीसाठी प्रमाणके रोपांच्या किमतीसह नमुना-2 मध्ये दिले आहेत. एका गावामध्ये असलेल्या शेतक-यांचा गट एकत्रितपणे स्वतंत्र प्रकल्प समजण्यात येईल व या गटामध्ये सर्व शेतक-यांच्या नावाची व लागवड केलेल्या रोपांच्या संख्येसह प्रजातीनिहाय नोंद घेतली जाईल. शासन निर्णय दिनांक 1 ऑक्टोबर 2016 अन्वये विहीत करण्यात आलेल्या कार्यपध्दतीनूसार वन विभागाच्या सामाजिक वनीकरण शाखेच्या अधिका-यांनी तांत्रिक मान्यता द्यावी व प्रशासकीय मान्यता संबंधित अधिका-यांनी द्यावी. व सदरचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करावा. |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | शासन निर्णय क्र.:- मग्रारो-2016/प्र.क्र.61/मग्रारो-1 दि.12/4/2018 |
ऑनलाईन सुविधा आहे का – | — |
असल्यास सदर लिंक – | — |
आवश्यक शुल्क | — |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | — |
निर्णय घेणारे अधिकारी – | — |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | शासन निर्णयानुसार |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | https://grievances.maharashtra.gov.in/ |
कार्यालयाचा पत्ता | गीता भवन गोपुरी चौक नागपूर रोड वर्धा |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | ०७१५२-२४२६२५ |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | ddsfdwardha@gmail.com |