बंद

आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वर्धा यांचेकडून १२ दिवसीय निवासी प्रशिक्षण

आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वर्धा यांचेकडून १२ दिवसीय निवासी प्रशिक्षण
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक अंतिम दिनांक संचिका
आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वर्धा यांचेकडून १२ दिवसीय निवासी प्रशिक्षण

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA)यांच्यातर्फे सन 2016 पासून संपूर्ण देशात प्रायोगिक तत्वावर “Up Scaling Aapada Mitra” ही योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेचे यश, आपत्ती व्यवस्थापनाबाबत समाजात झालेली जनजागृती, ग्रामीण स्तरावर कार्यरत आपदा मित्रांमुळे शासनास होणारी मदत इ. बाबींचा विचार विचार करून या वर्षी वर्धा जिल्ह्यामधून एकूण 300 आपदा मित्रांना (स्वंयसेवक) आपत्ती व्यवस्थापन विषयाबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आपदा मित्रांत नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी/विद्यार्थीनी, NCC/NSS विद्यार्थी, NGO, आशा, पोलिस पाटील, कोतवाल,अंगणवाडी सेविका, होमगार्ड, पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बल, खाजगी सुरक्षा रक्षक, शासकीय/निम शासकीय कर्मचारी यांचा समावेश करण्यात येणार आहे.
सहभागी प्रशिक्षणार्थीं मोफत 12 दिवसाचे निवासी प्रशिक्षण, आपातकालीन किट, विमा – रुपये 5 लक्ष , प्रमाणपत्र ई . देण्यात येणार आहे.
आपदा मित्र निवड निकष खालील प्रमाणे-
1. सदर व्यक्ती हि भारताची नागरिक असावी व संबंधित जिल्ह्यातील रहिवासी असावी.
2. सदर व्यक्ती हि शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावी.
3. वयोमर्यादा – 18 ते 45 वर्ष
सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नाव नोंदणी करण्याकरिता खालील लिंकमध्ये माहिती भरावी
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfRI-eH34mnn65QIwPmt2Mwbwd1k_eYyHpmBGZPdmn-VX-AiA/viewform?usp=header

31/01/2025 28/02/2025 पहा (111 KB)