बंद

आपल्या योजना

तारीख : 27/03/2018 - 31/03/2022 | क्षेत्र: विविध विभाग

नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती एकाच ऑनलाईन व्यासपीठावर उपलब्ध व्हावी या उद्देशाने ‘महायोजना’ या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आलेली आहे. महायोजना संकेतस्थळावर नागरिकांना विविध विभागाच्या योजनांची माहिती मिळेल. योजनेचा शासन निर्णय, पात्रतेचे निकष,अर्जाची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, लाभ मिळण्यास लागणारा कालावधी, संबंधित अधिकारी अशा अनेक मुद्द्यांची माहिती येथे देण्यात आलेली आहे. या शिवाय प्रत्येक विभागांतर्गत येणाऱ्या क्षेत्रिय कार्यालयांची व अधिकाऱ्यांची माहिती तसेच दूरध्वनी क्रमांक संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

https://mahaschemes.maharashtra.gov.in/

लाभार्थी:

नागरिक

फायदे:

या संकेतस्थळावर नागरिकांना विविध विभागाच्या योजनांची माहिती मिळेल. योजनेचा शासन निर्णय, पात्रतेचे निकष,अर्जाची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, लाभ मिळण्यास लागणारा कालावधी, संबंधित अधिकारी अशा अनेक मुद्द्यांची माहिती येथे देण्यात आलेली आहे

अर्ज कसा करावा

नागरिकाला योजनेची माहिती घेऊन योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक तयारी करून योग्य अधिकारी व कार्यालयाशी संपर्क साधणे या संकेतस्थळामुळे शक्य होईल. यामुळे मोठ्या प्रमाणावर वेळेची व श्रमाची बचत होईल.