बंद

डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन,वर्धा

योजना

तपशील स्पष्टीकरण
गटाची निर्मिती करणे गट स्थापन करत असताना एका तालुक्यामध्ये 10 गटांची निर्मिती करणे, एका गटामध्ये कमीतकमी २० शेतकरी अंनि जास्तीत जास्ती २५ शेतकऱ्यांचा समावेश असणे बंधनकारक आहे , मिशनमध्ये प्रती गटाला लाभ देण्याचे क्षेत्र जास्तीत जास्त ५० एकर पर्यंत मर्यादित असेल परंतु गटातील सर्व सदस्यांचे ८-अ प्रमाणे संपूर्ण क्षेत्र हे सेंद्रिय प्रमाणीकरणा खाली असेल, प्रत्येक गटामध्ये एक गट प्रमुख व एक गट प्रवर्तक यांची निवड केली जाईल, गटाची प्रत्येक महिन्यात किमान एक मासिक सभा घेणे बंधनकारक राहील, आवश्यक लागणारी कागदपत्रे खालीप्रमाणे
१) ७/१२ उतारा, ८ – अ,
२) आधार कार्ड
३) राष्टीयकृत बँक खाते
४) भागभांडवल जमा करणे
(५) आत्मा नोंदणी प्रमाणपत्र
६) प्रकल्प संचालक आत्मा यांच्या नावाने १००० रु, चा धनादेश ( D.D.)
प्रत्याशिके घेणे आणि मार्गदर्शक सूचनेनुसार बाबी राबविणे प्रत्याशिक :-बिजामृत, दश पर्णी अर्क, निंबोळी अर्क, जीवामृत, अमृतपाणी, अंडे जनित अमिनो आम्ल , तांदूळ पाणी, पंच गव्य घोल, काम्पोस्ट बेड लावणे, गांडूळ खत निर्मिती करणे,ई. विषया वर प्रत्याषिक घेणे. बाब राबविणे :- १) सेंद्रिय शेती रुपांतरणा साठी करावयाच्या उपाययोजना अ) मृदा नमुना तपासणी ब) जैविक कुंपण क) चर खोडणे
२) सेंद्रिय बियाणे संकलन
३) हिरवळीच्या खताची पिक लागवड करणे
४) कम्पोस्ट तयार करणे
५) कम्पोस्ट ची गुणवत्ता वाढविण्यासाठी जीवाणू खताचे वापर करणे
६) बिजप्रक्रीया
७) जमिनीमध्ये सूक्ष्म जीवजंतूचे प्रमाण वाढविणे
८) पिक सरक्षना साठी वनस्पती जन्य अर्क तसेच तरल किड रोधक यांचा वापर करणे
९) जैविक कीड व बुरशीनाशकाचा वापर करणे
१०) पिक सरक्षना साठी कामगंध सापळे, पिवळे, निळे चिकट सापळे, पक्षी थांबे ई. चा वापर करणे.
समूह संकलन केंद्र तयार करणे संलग्न असलेल्या १० गटांचे एक समुह संकलन केंद्र (१५ ते २० की. मी. अंतराच्या परीघाच्या आत स्थापन करण्यात येईल. हे केंद्र गटांसाठी मार्गदर्शन केंद्र व उत्पादित मालाचे खरेदी विक्री केंद्र म्हणून कार्य करेल. या केंद्रावर शेतमालाची प्राथमिक प्रक्रीया व साठवणुक करण्यात येईल. जैविक शेती मिशनच्या कालावधी नंतर सुद्धा हे कार्य योग्य प्रकारे सुरू ठेवण्याची जबाबदारी समूह संकलन केंद्राची (CAC) असेल.
तृतीय पक्ष सेंद्रिय प्रमाणीकरण सेंद्रिय प्रमाणीत शेतमालाची विक्री हि, मुल्यवृध्दी वर तथा बाजारातील मागणीवर आधारीत असते. सद्यस्थितीत देशांतर्गत तसेच आंतराराष्ट्रीय बाजारपेठेत तृतीय पक्षीय (थर्ड पार्टि) प्रमाणीत उत्पादनांची मोठी मागणी आहे. मिशन अंतर्गत प्रस्तावित क्षेत्राचे सेंद्रिय प्रमाणिकरणः “तृतीय पक्षीय” (थर्ड पार्टि) गट प्रमाणीकरण (आयसीएस ) पध्दतीने करण्यात येईल. या करीता सहभागी शेतक-यांकडील नमुना 8 अ मधिल पुर्ण क्षेत्रावर जैविक पध्दतीचा अवलंब करणे अपेक्षीत आहे. या संपूर्ण क्षेत्राचे प्रमाणीकरण जैविक मिशन निधीमधून केले जाईल. सदरचे प्रमाणीकरण हे भारत सरकारच्या APEDA (अपेडा) मान्यताप्राप्त संस्थाकडून करता येईल. सदरच्या संस्था या PMU स्तरावर विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून निवड करण्यात येईल व सदर संस्था निवडीला MPMB ची मान्यता घेण्यात येईल. NPOP ची मानके सोबत जोडलेल्या परिशिष्ठ मध्ये देण्यात आलेली आहेत त्याचा अवलंब मिशन मधील सर्व
सेंद्रिय माल विक्री केंद्र एकूण ५० विक्री केंद्र मिशनच्या माध्यमातून स्थापित करण्यात येतील. त्यासाठी रक्कम रु. ५ लाख प्रति विक्री केंद्रसाठी अनुदान देय राहील व त्यापेक्षा जास्त येणारा खर्च (FPO) करेल. सेंद्रीय माल विक्री केंद्र चालविण्याची जबाबदारी ही केंद्रा पासून जवळ असणाऱ्या शेतकरी उत्पादक संस्थेची (FPO) असेल. सदर विक्री केंद्रावर फक्त मिशनचा ब्राण्ड असलेले व गटातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या प्रमाणित शेतमालाचीच विक्री करता येईल. सेंद्रिय • माल विक्री केंद्रासाठी ठिकाणांची निवड पुढील प्रमाणे करावी.
१.सेंद्रिय माल विक्री केंद्रासाठी लागणारी जागा हि मोक्याच्या ग्राहकांच्या दृष्टीने सोयीचे) ठिकाणी असावी.
२. सदर जागा हि शासकीय मालकीची असल्यास सर्व संबंधित शासकीय यंत्रणांची मान्यता घेण्यात यावी.
३. सदर जागा खाजगी असल्यास भाडे करार तत्वावर घेण्यात यावी. भाडेतत्वावर असल्यास करारनामा हा किमान ११ वर्षाचा असावा. सदर जागेचे भाडे व इतर सर्व कर / देयके भरण्याची जबाबदारी हि संबंधित FPO ची राहील.
४. सदर जागा हि किमान २०० sq असावी
५. सर्व सेंद्रीय माल विक्री केंद्र हे प्रकल्प व्यवस्थापन कक्ष (PMU) यांची निश्तिच केलेल्या आराखडा (Design)नुसारच सर्व ठिकाणी सारखे असावे.
जैविक महासंघाची निर्मिती करणे जैविक मिशनमध्ये सर्व FPO यांचा एकत्रित एक जैविक महासंघ स्थापित करण्यात येईल. जैविक महासंघ हा एक मोठ्या उद्योग समूहसारखा काम करेल, जैविक महासंघ FPO म्हणून रजिस्टर झाल्यावर तो आपला प्रकल्प अहवाल प्रकल्प व्यवस्थापन यूनिट कड़े सादर करेल व त्यास मिशन प्रोजेक्ट मैनेजमेंट बोर्ड (MPMB) मान्यता देईल, मिशन: मधील सर्व FPO यांना जैविक महासघंचे भागधारक होणे बंधनकारक राहील. या व्यतिरिक्त मिशन मधील सर्व शेतकऱ्यांना महासंघाचे पाहिजे त्या प्रमाणात सम भाग घेणेकरिता प्राधान्य देण्यात येईल, परंतु महासंघची सदस्यता ही ऐच्छिक असेल. महासंघाला आवश्यकता वाटल्यास ते मिशन कार्यक्षेत्राच्या बाहेरील शेतकऱ्यांना देखील समभाग देऊ शकेल पण तो शेतकरी सेंद्रिय शेती उत्पादक असणे बंधनकारक राहील.
जेविक महासंघाच्या माध्यमातून प्रतवारी, प्रक्रिया, पॅकेजिंग, लेबलिंग, ब्रांडिंग करून एकाच ब्राण्डने मालाची विक्री करेल. सर्व समूह संकलन केंद्राचा माल जैविक महासंघ खरेदी करेल, जैविक संघाद्वारे सदर मालाकरीता लागणारी साठवणूक व्यवस्था व वाहतूक व्यवस्था याच ठिकाणी निर्माण केल्या जातील. तसेच प्रमाणित सेंद्रीय मालाची घावक विक्री फक्त जैविक महासंघ स्तरावरुनच होईल..
बाजार पेठेशी दुवा शेतमालाची घाउक, तसेच निर्यातक्षम बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी उपभोक्ता तसेच खरेदीदार यांना माहिती देणे महत्वाचे असते. सेंद्रिय प्रमाणित मालाची स्थानिक उपभोक्तांना विक्री व्हावी यासाठी तालुका स्तरावर उपभोक्ता जागृती संम्मेलन आयोजित करण्यात यावे. समाजातील डॉक्टर्स, प्राध्यापक, नौकरजीवी वर्ग ई. व प्रसिध्दी माध्यमांना सहभागी करून आरोग्यासाठी जैविक भाजीपाला, फळे, खाद्यांने ई. चे महत्व विषद करावे. येथुन स्थानिक विक्री चे करार करावे. साधरणतः उपभोक्त्यांकडुन गहु, ज्वारी, तांदुळ, डाळी ई. ची हंगामा नंतर घाउक खरेदी केली जाते. यावेळी तालुका आणि जिल्हा स्तरावर जैविक धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात यावे. प्रचार प्रसिध्दी व उपभोक्ता जागृती तालुका ‘पातळीवर आयोजन करण्यात येईल. ब्रँड तयार करणे मिशन मधील जैविक सेंद्रिय प्रमाणीत मालासाठी एकच ब्रांड तयार करण्यात यावा. यामुळे उपभोक्त्यांमध्ये अशा ब्रँड ची ओळख निर्माण होउन मागणी वाढेल. तसेच मार्केटिंक सुलभ होण्यासाठी शहरातील प्रमुख बाजारपेठेत, चौकात जैविक ब्रँड चे होर्डिंग्स लावावे आणि स्थानिक वृत्तपत्रांमधुन प्रसिद्धी करावी. उपरोक्त बाबींचे आयोजन करणेकरिता सदरील उपक्रमांचा समावेश सविस्तर प्रकल्प अहवालामध्ये करावा व त्याचा प्रस्ताव सेवा प्रदाता संस्थानी DMU कार्यालयास सादर करावा व DMU कार्यालयाने प्रस्तावाची शिफारस प्रकल्प व्यवस्थापन कक्षास (PMU) करावी. सदरील उपक्रम प्रकल्प व्यवस्थापन कक्ष (PMU) पातळीवरून राबविण्यात येतील.
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) मार्गदर्शक सूचना जा.क्र/आत्मा/स्मार्ट/345/2021 कृषि आयुक्तालय पुणे दी 20/05/2021
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी उपलब्ध नाही
ऑनलाईन सुविधा आहे का – youtube channel उघडण्यात आले आहे ( नाव : – Dr. Panjabrao Deshmukh Organic Farming Mission )
असल्यास सदर लिंक – https://youtube.com/c/DrPanjabraoDeshmukhOrganicFarmingMission
आवश्यक शुल्क
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत
निर्णय घेणारे अधिकारी – प्रकल्प संचालक,आत्मा,वर्धा
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – संबधित नाही
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक संबधित नाही
कार्यालयाचा पत्ता प्रकल्प संचालक आत्मा वर्धा, डॉ सचिन पावडे हॉस्पिटल बॅचलर रोड वर्धा
संपर्क दुरध्वनी क्रमांक ०७१५२ – २५०२४२

संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी pdjsm.dmuwardha@gmail.com