बंद

राष्ट्रीय कुटुंबलाभ योजना.

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे 1.     विहीत नमुन्यातील अर्ज
2.     प्रमुख कमावत्या व्यक्तीचा मृत्युचा दाखला – ग्रामसेवक किंवा नगरपालिका यांचेकडील दाखला.
3.     दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीचा साक्षांकित प्रमाणपत्र – ग्रामसेवक किंवा नगरपालिका यांचेकडील दाखला.
4.     स्वयं घोषणा पत्र व शिधापत्रिका.
5.     मृत व्यक्तीचा व अर्जदाराचा वयाचा दाखला – शाळा सोडल्याचा दाखला किंवा जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडील वयाचा दाखला.

संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) राय्टीय कुटुंब लाभ योजना अंतर्गत येणाऱ्या योजनांचा शासन संदर्भ सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग शासन निर्णय क्रमांक – विसयो 2018/प्र.क्र.62/विसयो -2, मंत्रालय, मुंबई – 400032 दि. 20ऑगष्ट 2019 व शासनाने वेळोवेळी ठरवून दिलेले इतर मार्गदर्शक तत्वे.

निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी ऑनलाईन प्रणालीव्दारे अर्ज दाखल झाल्यावर दोन महिन्याच्या आत तलाठी (चौकशी अधिकारी) लाभार्थ्यांच्या आलेल्या अर्जावर सखोल चौकशी करुन, कागदपत्राची छाननी करुन सविस्तर अहवाल सादर करतात व मिटींगमध्ये मंजुरीस पाठविले जातात. मिटींगमध्ये प्रकरणे मंजुर/नामंजूर झाल्यावर मंजुर/नामंजूर अर्जाची माहिती लाभार्थ्यांना ऑनलाईन प्रणालीव्दारे कळविली जाते. त्यानंतर लाभार्थाची ओळख पटवून घेऊन, रजिस्टरमध्ये नोंद घेऊन, सर्व पात्र लाभार्थ्यांचे बिल दरमहा कोषागारात सादर केले जाते. त्यावरुन योजनानिहाय बॅक याद्या तयार करुन, लाभार्थ्यांना बॅक खात्यावर पैसे वितरीत केले जातात.

ऑनलाईन सुविधा आहे का – होय

असल्यास सदर लिंक – https://aaplesarkar.maharashtra.gov.in/
आवश्यक शुल्क महाऑनलाईन व्दारे अर्ज भरते वेळी शुल्कानुसार

शुल्क असल्यास भरण्याची पद्धत अर्ज दाखल करते वेळी ऑनलाईन व्दारे.

निर्णय घेणारे अधिकारी – शासनमान्य गठीत शासकीय कमिटी अध्यक्ष व सदस्य, जर समिती नसेल तर‍ सदस्य, सचिव नायब तहसिलदार/ तहसिलदार

निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – 3 महिने

ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://sjsa.maharashtra.gov.in
कार्यालयाचा पत्ता जिल्हाधिकारी कार्यालय / तहसिल कार्यालय / तलाठी कार्यालय

संपर्क दुरध्वनी क्रमांक

संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी sgywardha@gmail.com