सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग (समाज कल्याण )
विभागाची माहिती | |
---|---|
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक 4370, दिनांक 5 नोव्हेंबर 1928 अन्वये स्टार्ट समितीची स्थापना. 1930 सदर समितीमध्ये एकूण 10 सदस्यांचा समावेश. सदर समितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही समावेश. समितीचा अहवाल 1930 साली शासनास सादर.1932 मागास समाजासाठी 1932 साली बॅकवर्ड क्लास वेलफेअर डिपार्टमेंटची स्थापना. श्री. ओ एच बी स्टार्ट, आय. सी. एस., खात्याचे पहिले संचालक.19471947 साली संचालक, बॅकवर्ड क्लास वेलफेअर यांचे कार्यालय मुंबई येथून पुणे येथे स्थलांतरित.1957 शासन निर्णय क्रमांक बी.सी.ई. 2857 डी, दिनांक 23 सप्टेंबर 1957 अन्वये मुख्य निरीक्षक प्रमाणित शाळा आणि संचालक, बॅकवर्ड क्लास वेलफेअर या दोन कार्यालयांचे एकत्रीकरण करुन समाज कल्याण संचालनालयाची स्थापना. 1972 समाज कल्याण विभागाची निर्मिती होऊन शिक्षण व समाज कल्याण अशी विभागणी माहे मार्च 1972 मध्ये झाली. 1983 समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य, क्रिडा व पर्यटन विभाग असे नामकरण सन 1983 मध्ये करण्यात आले.1999 मार्च,1999 मध्ये समाज कल्याण विभागाचे विभाजन करुन विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग अशी स्वतंत्र विभागाची स्थापना करण्यात आली.2001फेब्रुवारी 2001 मध्ये समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य व क्रिडा विभागाचे नाव सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रिडा विभाग असे करण्यात आले. |
1. कर्मविर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | शासन निर्णय सामाजिक न्याय विभाग दिनांन 14/08/2018 अन्वये सदर योजनेचे कामकाज पुर्ण केले जाते. |
योजनेची थोडक्यात माहीती | असुसूचित जाती व नवबौध्द घटका करिता ही योजना सन 2004-05 पासुन कार्यान्वीत असून दारिद्रय रेषेखालील भूमिहिन शेत मजुर कुटुबांना उदर निर्वाहाचे अन्य साधन नसल्याने त्यांना रोजगार हमी योजना किंवा खाजगी व्यक्तीकडे मजुरी करावे लागते. परिणामी त्यांच्या राहणीमानावर प्रतिकुल परिणाम होतो. त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे व त्यांच्या राहणीमानात बदल व्हावा याकरिता त्यांचे मजुरीवर असलेले अवलंबित्व कमी होऊन त्यांना कायम स्वरुपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे या उद्देशानेही योजना राबविण्यात येते. |
आवश्यक कादपत्रे | 1) जातीचा दाखला (उपविभागीय अधिकारी यांनी दिलेला) 2) शाळा सोडल्याचा दाखला अथवा वयाचा कोणताही पुरावा. 3) रहिवासाचे प्रमाणपत्र व दारिद्रय रेखेखाली असल्या संबंधी ग्रामसेवक व गटविकास अधिकारीयाच ेप्रमाणपत्र 4) अर्जदार भुमीहीन शेतमजुर असल्याबाबत तलाठी व तहसिलदार सरंनी दिलेले प्रमाणपत्र. 5) विधवा स्त्रियाच्याबाबतीत पतीच्या मृत्युचा दाखला. 6) परित्याक्त्या स्त्रियाच्या बाबतीत सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र. |
अर्ज कुठे करावा (ऑलाईन/ऑनलाईन) | सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण वर्धा |
सदर लिंक | — |
आवश्यक शुल्क | सदर योजना 100 % अनुदानित आहे. |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | 6-8 महिने |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | https://grievances.maharashtra.gov.in |
कार्यालयाचा पत्ता | डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सेवाग्राम रोड वर्धा |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | 07152-295020 |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | sdswo123wrd@gmail.com, acswowardha@gmail.com |
2. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | शासन निर्णय सामाजिक न्याय विभाग दिनांक 26/12/2024 अन्वये सदर योजनेचे कामकाज पुर्ण केले जाते. |
योजनेची थोडक्यात माहीती | अनु. जाती व नवबौध्द घटकातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहात जागे अभावी प्रवेश मिळालेला नाही अशा 10 वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सदरची योजना तालुका तसेच जिल्हा स्तरावर देण्यात येते. |
योजनेमध्ये देण्यात येणारे लाभ | भा.स.शि अंतर्गत मिळणारा निर्वाह भत्ता वजावट करुन मिळणारी रक्कम खालील प्रमाणे आहे. इतर जिल्ह्याच्या ठिकाणी :- रु. 43000/- तालुक्याच्या ठिकाणी :- 38000/- या व्यतीरीक्त शैक्षणिक साहीत्या करीता अभियांत्रिकी व वैद्यकिय अभ्यासक्रमास :-5000/- अन्य शाखा :- 2000/- |
आवश्यक कादपत्रे | 1. जातीचा दाखला 2. शाळा सोडल्याचा दाखला व मागील वर्षाच्या गुणपत्रिका 3. अधिवास प्रमाणपत्र 4. उत्पनाचा दाखला 5. भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहीवाशी नसल्याचे प्रतिज्ञापत्र (नोटरी) 6. विद्यार्थ्याने सादर केलेली माहीती खरी व अचूक असल्याचे स्वयंघोषणापत्र 7. कोणत्याही शासकीय वसतीगृहात प्रवेश घेतला नसलेबाबतचे प्रमाणपत्र. 8. भाड्याने राहत असल्याबाबतचे भाडे चिठ्ठी व भाडे करारनामा 9. महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा. 10. उपस्थिती व चारित्र्य प्रमाणपत्र |
अर्ज कुठे करावा (ऑलाईन/ऑनलाईन) | ऑनलाईन |
सदर लिंक | https://hmas.mahait.org/ |
आवश्यक शुल्क | रु. 23.60 (including GST). |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | 1 ते 2 महीने |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | https://hmas.mahait.org/ |
कार्यालयाचा पत्ता | डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सेवाग्राम रोड वर्धा |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | 07152-295020 |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | sdswo123wrd@gmail.com, acswowardha@gmail.com |
3. अत्याचारास बळी ठरणाऱ्या अनुसूचित जाती-जमातीच्या कुटुंबातील सदस्यांना अर्थसहाय्य
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | १) युटीए-१०९५/प्र.क्र-१६९/मावक-२. दिनांक २४ सप्टेंबर १९९७ २) युटीए-१०१३/प्र.क्र.२५९/सामासु. दि २१ ऑगस्ट २०१३ ३) युटीए-१०१६/प्र.क्र.२९८ / साभासु. दि. २३ डीसेंबर २०१६ |
योजनेची थोडक्यात माहीती | जातीयतेच्या कारणावरून अत्याचाराला बळी पडलेल्या अनुसूचित जाती /जमाती व्यक्तींना अर्थसहाय्य देऊन त्यांचे पुनर्वसन करणे.. |
योजनेमध्ये देण्यात येणारे लाभ | अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या कुटुंबावर / व्यक्तींवर अत्याचार घडल्यास, सदर गुन्ह्यांची नोंद नागरी हक्क संरक्षण अधिनीयम १९५५ खाली / अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ खाली झालेली असल्यास गुन्ह्याच्या स्वरूपावरून रु. १ लाख ते ८.२५ लाखापर्यंत अर्थसहाय्य मंजूर करण्यात येते. |
आवश्यक कादपत्रे | योजनेच्या लाभासाठी जातीच्या दाखला व काही गुन्ह्यात वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. |
अर्ज कुठे करावा (ऑलाईन/ऑनलाईन) | अर्ज करण्याची गरज नाही सदरचा प्रस्ताव हा पोलीस विभागामार्फत कार्यालयास प्राप्त होतो. |
सदर लिंक | — |
आवश्यक शुल्क | — |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | 1 ते 2 महीने |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | — |
कार्यालयाचा पत्ता | डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सेवाग्राम रोड वर्धा |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | 07152-295020 |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | sdswo123wrd@gmail.com, acswowardha@gmail.com |
4. अनुसुचित जातीच्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरविणे योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | 1.शासन निर्णय एस टी एस-2011/प्रक्र 439/अजाक-1 दि. 06 डिसेंबर2012 2.शासन निर्णय एस टी एस-2015/प्रक्र 102/अजाक-1 दि. 03 सप्टेंबर 2015 3.शासन निर्णय एस टी एस-2016/प्रक्र 125/अजाक- दि. 27मार्च 2017 |
योजनेची थोडक्यात माहीती | अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, त्यांची आर्थिक उन्नती व्हावी व त्यांचे सक्षमीकरण व्हावे, यासाठी सदर योजना राबविण्यात येत आहे. |
योजनेमध्ये देण्यात येणारे लाभ | स्वयंसहायता बचत गटांना ३.५० लाख रुपयांच्या कमाल मर्यादित (९० टक्के) शासकीय अनुदान १० टक्के स्वयंसहायता बचत गटांचा हिस्सा) १ ते १८ अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करण्यात येतो. जादा अश्वशक्तीचा ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करता येतील मात्र त्याची किमत कमाल शासकीय अनुदानापेक्षा (३.१५) लक्ष शासकीय अनुदान व जादा रक्कम बचत गटांनी खर्च करावी. लाभाचे हस्तांतरण आर.टी.जी.एस. द्वारे बचत गटाच्या बँक खात्यामध्ये थेट जमा होते. |
आवश्यक कादपत्रे | 1.महाराष्ट्राचा रहिवाशी असावा 2.बचत गटातील 80%सदस्य हे अनु.जाती व नवबौध्द घटकाचे असावे. किमान 3.बचत गटातील सर्व सदस्यांचा एकत्रीत फोटो असावा 4.बचत गट स्थापनेचा ठराव असावा 5.रु.100 स्टॅम्प पेपर वर नमुद करावे कि अ)या अगोदर मिनी ट्रॅक्टर योजनेचा शासनाकडुन लाभ घेतला नाही. ब) आरटीओ कडील नोंदणी शुल्क भरण्यास बचत गट तयार आहे. क)योजनेचा स्वहिस्सा 10% रुपये 35,000/- बचत गट भरण्यास तयार असावा. 6.बचत गट नोंदणीकृत असावा व नोंदणी प्रमाणपत्र सोबत जोडावे. 7.विवाहीत महिलांच्या बाबतीत जात प्रमाणपत्र वडीलांच्या नावे व ओळखपत्र हे पतीच्या नावे असेल तर महिलांनी 20 रु च्या स्टॅम्प पेपरवर स्वहस्ते साक्षांकीत करुन दयावे. 8.मिनी ट्रॅक्टर मिळविण्यासाठी सर्व सदस्यांचा ठराव व सर्व सदस्यांची सहीनीशी यादी. |
अर्ज कुठे करावा (ऑलाईन/ऑनलाईन) | ऑफलाईन |
सदर लिंक | — |
आवश्यक शुल्क | कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | 1 ते 2 महीने तसेच शासनाकडुन प्राप्त निधीच्या अधिन राहुन |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | — |
कार्यालयाचा पत्ता | डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सेवाग्राम रोड वर्धा |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | 07152-295020 |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | sdswo123wrd@gmail.com, acswowardha@gmail.com |
5. अनु. जाती अभ्युदय योजना (प्रधानमंत्री आदर्शग्राम योजना)
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | शासन निर्णय सामाजिक न्याय विभाग दिनांक 26/08/2019 अन्वये सदर योजनेचे कामकाज पुर्ण केले जाते. |
योजनेची थोडक्यात माहीती | केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व सक्षमिकरण मंत्रालयाने सन 2009-10 या वर्षापासून प्रायोगिक तत्वावर प्रधानमंत्री आदर्शग्राम योजना लागू केलेली आहे. सदर योजने अंतर्गत अनु.जाती ची 50 % पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावात मुलभुत सोयी सुविधा कामे व ईतर अपक्रम राज्य शासनाच्या ईतर योजनांची मेळ घालून मंजूर केली जातात. या योजने सोबतच राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनाची सदर गावांमध्ये अंमलबजावणी करून सदर गावांचा सर्वागीन विकास करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. |
योजनेमध्ये देण्यात येणारे लाभ | गावत संर्वागीण विकास करणे |
आवश्यक कादपत्रे | — |
अर्ज कुठे करावा (ऑलाईन/ऑनलाईन) | सदर योजने अंतर्गत गावाची निवड हि शासनस्तरावरुन करण्यात येते. |
सदर लिंक | — |
आवश्यक शुल्क | कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | — |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | — |
कार्यालयाचा पत्ता | डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सेवाग्राम रोड वर्धा |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | 07152-295020 |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | sdswo123wrd@gmail.com, acswowardha@gmail.com |
6. सैनिकी शाळेतील अनुसूचित जातीच्या विदयार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | 1.शासन निर्णय क्र. संकीर्ण2002/ प्र.क्र.371/ मावक-3, दिनांक- 05.08.2003 2.शासन निर्णय क्र. इबीसी 2003/प्र.क्र.184/ मावक-२, दिनांक- 17.09.2003 3. शासन निर्णय क्र. अजाशि2019/प्र.क्र.53/ शिक्षण- 1 दिनांक- 21.03.2019 |
योजनेची थोडक्यात माहीती | मागासवर्गीय विदयार्थ्यांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनिमध्ये प्रवेश मिळावा, सैन्यदलात भरती होण्याचे आकर्षण त्यांच्यात विदयार्थीदशेतच निर्माण व्हावे , विदयार्थ्यामध्ये शिस्त ,आत्मविश्वासव,शौर्य,सांघिक वृत्ती,नेतृत्व ,देशभक्ती इत्यादी गुणांची जोपासणा होण्यासाठी ही योजना लागु करण्यात आली आहे. |
योजनेमध्ये देण्यात येणारे लाभ | मान्यताप्राप्त सैनिक शाळेतील विदयार्थ्यांना प्रतिवर्षी रु.15000/- सैनिकी शाळा निर्वाह भत्ता देण्यात येते |
आवश्यक कादपत्रे | 1.आधार कार्ड 2.जातीचे प्रमाणपत्र 3.उत्पन्न दाखला 4.परिक्षेचे गुणपत्रक |
अर्ज कुठे करावा (ऑलाईन/ऑनलाईन) | ऑनलाईन |
सदर लिंक | https://prematric.mahait.org |
आवश्यक शुल्क | कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | — |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | https://prematric.mahait.org |
कार्यालयाचा पत्ता | डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सेवाग्राम रोड वर्धा |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | 07152-295020 |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | sdswo123wrd@gmail.com, acswowardha@gmail.com |