बंद

अनुसुचित जातीच्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधणे पुरविणे योजना

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे 1.महाराष्ट्राचा रहिवाशी असावा
2.बचत गटातील 80%सदस्य हे अनु.जाती व नवबौध्द घटकाचे असावे. किमान
3.बचत गटातील सर्व सदस्यांचा एकत्रीत फोटो असावा
4.बचत गट स्थापनेचा ठराव असावा
5.रु.100 स्टॅम्प पेपर वर नमुद करावे कि
अ)या अगोदर मिनी ट्रॅक्टर योजनेचा शासनाकडुन लाभ घेतला नाही.
ब) आरटीओ कडील नोंदणी शुल्क भरण्यास बचत गट तयार आहे.
क)योजनेचा स्वहिस्सा 10% रुपये 35,000/- बचत गट भरण्यास तयार असावा.
6.बचत गट नोंदणीकृत असावा व नोंदणी प्रमाणपत्र सोबत जोडावे.
7.विवाहीत महिलांच्या बाबतीत जात प्रमाणपत्र वडीलांच्या नावे व ओळखपत्र हे पतीच्या नावे असेल तर महिलांनी 20 रु च्या स्टॅम्प पेपरवर स्वहस्ते साक्षांकीत करुन दयावे.
8.मिनी ट्रॅक्टर मिळविण्यासाठी सर्व सदस्यांचा ठराव व सर्व सदस्यांची सहीनीशी यादी.

संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) 1.शासन निर्णय एस टी एस-2011/प्रक्र 439/अजाक-1 दि. 06 डिसेंबर2012
2.शासन निर्णय एस टी एस-2015/प्रक्र 102/अजाक-1 दि. 03 सप्टेंबर 2015
3.शासन निर्णय एस टी एस-2016/प्रक्र 125/अजाक- दि. 27मार्च 2017
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी
ऑनलाईन सुविधा आहे का –
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत
निर्णय घेणारे अधिकारी – सहायक आयुक्त, समाज कल्याण,वर्धा
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी –
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक
कार्यालयाचा पत्ता कार्यालय सहाय्यक आयुक्त समाज कल्याण वर्धा.सेवाग्राम रेल्वे स्टेशन रोड,वर्धा
संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-243331
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी sdswo123wrd@gmail.com