बंद

कन्या वनसमृध्दी योजना

योजना

तपशील स्पष्टीकरण
कार्यपद्धती ज्या कुटूंबामध्ये मुलगी जन्माला येईल अशा शेतकरी दाम्पत्यांला 10 रोपे विनामूल्य देऊन प्रोत्साहित करणे.
सदर योजनेच्या लाभाकरीता शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या मुलीच्या पालकांनी मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायत‍ या ठिकाणी मुलीच्या नावाची नोंद केल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतीकडे विहीत नमुन्यात अर्ज करावा.
ज्या शेतकरी दांपत्यास मुलगी होईल त्या शेतकरी दांपत्याने मुलीसाठी तिच्या जन्मानंतर येणा-या पहिल्या पावसाळयात दि.1 ते 7 जुलै या कालावधीत 10 झाडे लावण्याची संमंती विहीत नमुन्यातील अर्जात दर्शवावी.
अर्जामध्ये मुलीचे संपूर्ण नाव, पालकाचे संपूर्ण नाव, संपर्कासाठी संपूर्ण पत्ता व आधार कार्ड नंबर इ. उल्लेख करावा.
नजीकच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकेतून 10 रोपे विनामुल्य ग्रामपंचायती मार्फत दिली जातील.
लागवड केलेल्या झाडांपासून मिळणारे सर्व उत्पन्न मुलीचा कौशल विकास, उच्च शिक्षण आणि रोजगार मिळविणे व मुलीच्या उज्जल भविष्यासाठी शेतक-यांना त्यांच्या एैच्छिकतेनुसार वापरण्यास मुभा राहिल.

संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) शासन निर्णय क्र.:- साववि-2016/प्र.क्र.165/फ-11 दि.27/6/2018
ऑनलाईन सुविधा आहे का –
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत
निर्णय घेणारे अधिकारी –
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – शासन निर्णयानुसार
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://grievances.maharashtra.gov.in/
कार्यालयाचा पत्ता गीता भवन गोपुरी चौक नागपूर रोड वर्धा

संपर्क दुरध्वनी क्रमांक ०७१५२-२४२६२५
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी ddsfdwardha@gmail.com