बंद

किसान क्रेडिट कार्ड योजना

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे रु. 1.60 लाखा पर्यंत रकमेच्या नवीन पिककर्जासाठी :
1. 7/12 उतारा
2. 8 अ
3. नकाशा
4. फेरफार
5. आधार कार्ड प्रत
6. 3 फोटो
7. स्टैम्प (कर्ज रकमेनुसार : रु. 100 चे 3 किंवा 4 स्टैम्प).
रु. 1.60 लाखां पेक्षा जास्त रकमेच्या नवीन पिककर्जासाठी :
1. 7/12 उतारा
2. 8 अ
3. नकाशा आणि चतुर्सीमा
4. फेरफार
5. मूल्यांकन पत्र
6. सर्च रिपोर्ट आणि त्यानुसार आवश्यक असल्यास वकिलांनी सुचवलेले अतिरिक्त कागदपत्रे.
7. आधार कार्ड प्रत
8. 3 फोटो
9. स्टैम्प आणि स्टैम्प ड्यूटि (कर्ज रकमेनुसार).
पिककर्ज नूतनीकरण /रीनिवल (Renewal) करण्यासाठी

1. 7/12 उतारा आणि 8 अ (संगणीकृत प्रत सुद्धा चालेल)
2. आधार कार्ड प्रत
3. नवीनीकरण अर्ज (शाखेतुन मिळेल)
4. पिकविमा काढण्याचा अर्ज (शाखेतुन मिळेल). पिकविमा हा ऐच्छिक आहे.

संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) रिझर्व बैंक ऑफ इंडिया परीपत्रक क्रमांक RBI/2017-18/4, FIDD.CO.FSD.BC.एनओ.7/05.05.010/2017-18 दिनांक 03.07.2017

निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी शाखेला अर्ज प्राप्त झाल्यावर शाखा प्रबंधक दस्तावेज तपासणी आणि पूर्व स्वीकृती निरीक्षण करून निर्णय घेतील.

ऑनलाईन सुविधा आहे का –
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत
निर्णय घेणारे अधिकारी – शाखा प्रबंधक

निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – 7 ते 15 दिवस

ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://grievances.maharashtra.gov.in/mr
कार्यालयाचा पत्ता अग्रणी जिल्हा प्रबंधक कार्यालय, जयस्वाल भवन, नागपुर रोड, वर्धा-४४२००१.
संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-243873

संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी wardhaldo.nagpur1@bankofinida.co.in