बंद

केंद्र शासन पुरस्कृत मागास क्षेत्र विकास योजने अंतर्गत प्राप्त अनुदानाच्या अनुषंगाने कामांस प्रशासकीय मान्यता देणेबाबत कार्यवाही.

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे 1.   नगर परिषद, नगरक पंचायत व महानगर पालिका यांचेकडून आलेला प्रस्ताव.
2.   जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूर झालेल्या कामाच्या आराखडयाची प्रत.
अ.    मागासक्षेत्र अनुदानाबाबत शासन निर्णयाची प्रत
ब. जिल्हा ग्रामिण विकाय योजना, अहमदनगर यांनी मंजूर केलेल्या अनुदान आदेशाची प्रत.
क. नगर परिषद/नगर पंचायत/महानगरपालिका यांच्या सर्वसाधारण सभेच्या ठरावाची प्रत.
ड. प्रस्तावातील कामांची तांत्रिक मान्यतेची प्रत
इ. सदर कामे इतर योजनेमधून घेतलेली नाहीत या बाबतचे प्रमाणपत्र
ई. अनुदान प्राप्त झालेल्या रकमे इतक्याच रकमेचा प्रस्ताव आहे काय याची खात्री करुनख्‍ प्रस्तावामध्ये अनुदानापेक्षा जास्तीची रक्कम असल्यास सदरची
रक्कम ही नपा फंडातुन खर्च करण्यात येईल याबाबतचे प्रमाणपत्र किंवा इतर निधीतून खर्च करावयाची असल्यास तसे प्रमाणपत्र प्रस्तावासोबत घेणे.
3. प्रस्तावातील काम ज्या जमिनीवर घ्यावयाचे आहे ती जमिन नगरपरिषद/महानगरपालिकेच्या ताब्यात असल्याचे प्रमाणपत्र
4. बांधकाम विषयक काम असल्यास, नगररचना शाखेकडून प्रस्तावित कामाच्या रेखांकन नकाशांना मंजूरी प्राप्त झाल्याच्या आदेशाची प्रत.
5. मागील आर्थिक वर्षामध्ये प्राप्त झालेल्या निधीचा पुर्णपणे विनियोग केल्याचे प्रमाणपत्र
6. सदर अनुदानातून यापूर्वी घेतलेली प्रशासकीय मान्यता दिनांक व रक्कम, झालेला खर्च या बाबतची माहिती दर्शविणारे विवरणपत्र.

संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास व जलसंधारण विभाग यांचेकडील शासन निर्णय बीआरजीएफ 2010/प्र.क्र.114/पंरा-6 दि.28/7/2010.

निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी मुद्या क्र.2 मधील नमुद आवश्यक कागदपत्रांची छाननी करुन केंद्र शासन पुरस्कृत मागास क्षेत्र विकास योजने अंतर्गत प्राप्त अनुदानाच्या अनुषंगाने कामांस प्रशासकीय मान्यते बाबत कार्यवाही करणेत येते. 13 वा वित्त आयोग अंतर्गत प्राप्त अनुदानाच्या अनुषंगाने प्रशासकीय मान्यतेबाबत कार्यवाही करणेत येते.

ऑनलाईन सुविधा आहे का – नाही
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क

शुल्क असल्यास भरण्याची पद्धत

निर्णय घेणारे अधिकारी – जिल्हाधिकारी वर्धा
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – 15 दिवस

ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://grievances.maharashtra.gov.in
कार्यालयाचा पत्ता जिल्हा सह आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा
संपर्क दुरध्वनी क्रमांक 7152 – 250030

संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी mawardha99@gmail.com