बंद

गटई स्टॉल

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे 1. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी व अनुसूचित जातीचा असावा.
2. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे ग्रामिण भागात रु.40000/- पेक्षा व शहरी भागात रु.50000/- पेक्षा अधिक नसावे, या साठी तहसिलदार यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र आवश्यक राहिल.
3. अर्जदाराचे वय 18 वर्षे पक्षा कमी नसावे.
4. अर्जदार ज्या जागेत स्टॉल मागत असेल ती जागा ग्रामपंचायत, नगरपालिक, छावणी बोर्ड( कॉन्टोनमेंट बोर्ड), किंवा महानगरपालिक यांनी त्यास भाडयाने, कराराने, खरेदीने अगर मोफत परंतु अधिकृतरित्या ताब्यात दिलेली असावी किंवा ती त्याच्या स्वत:च्या मालकीची असावी.

संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) 1.शासन निर्णय क्र विघयो-1097/प्रक्र175/मावक-2, दि 31 डीसेबर 1997
२.शासन निर्णय क्र गटई-2011/प्रक्र147/मावक-2, दि 08 डीसेबर 2011
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी 1.गटई पत्र्याचे स्टॉल हे एका कुटूंबात केवळ एकाच व्यक्तीला दिला जाते.
2.ग्रामीण भाग, क वर्ग नगरपालिका ब वर्ग- अ वर्ग नगरपालिका तसेच महानगरपालिका व छावणी क्षेत्रात सदर गटई स्टॉल करिता जागा उपलब्ध करुन घेण्याची जागा संबंधित स्टॉलधारकाची राहील.

ऑनलाईन सुविधा आहे का –
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत
निर्णय घेणारे अधिकारी – सहायक आयुक्त, समाज कल्याण,वर्धा
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी –
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक
कार्यालयाचा पत्ता कार्यालय सहाय्यक आयुक्त समाज कल्याण वर्धा.सेवाग्राम रेल्वे स्टेशन रोड,वर्धा
संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-243331
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी sdswo123wrd@gmail.com