बंद

डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका व खाजगी बँका यांनी लाभ धारकांची यादी त्यांनी घेतलेले कर्ज, परतफेडीची रक्कम व दिनांक इत्यादी तपशीलासह थेट तालुक्याचे सहाय्यक निबंधक यांचेकडे मागणी प्रस्ताव दाखल करणे.
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) महाराष्ट्र शासन, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, शासन निर्णय क्र.संकीर्ण-0521/प्र.क्र.60/18-स, दिनांक 11 जुन, 2021
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी 3.00 लाख अल्पमुदत पिक कर्जाची परतफेड विहित मुदतीत (365 दिवस किंवा 30 जुन चे आंत) करणा-या शेतक-यांना 3% व्याज सवलतीचा लाभ सन 2021-2022 पासुन देण्याची योजना जाहीर केली आहे. (सदरची योजना यापुर्वी दि. 3 डिसेंबर, 2012 चे शासन निर्णयान्वये 1.00 लाख कर्जावर 3 % व 1.00 ते 3.00 लाख कर्जावर 1% व्याज सवलत देण्याची योजना होती.)
ऑनलाईन सुविधा आहे का – नाही, बँक सहकार्य करीत नाहीत.
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत
निर्णय घेणारे अधिकारी – तालुका सहाय्यक निबंधक यांनी तपासुन शिफारश केलेले प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांचेस्तरावर मंजुर केले जातात.
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – उपलब्ध निधीनुसार प्रस्ताव मंजुर केले जातात.
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक
कार्यालयाचा पत्ता जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वर्धा यांचे कार्यालय,केशरीमल शाळेसमोर, सुदामपुरी, वर्धा.
संपर्क दुरध्वनी क्रमांक (07152)255756
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी ddr_wda@rediffmail.com