• सामाजिक दुवे
  • साईट मैप
  • Accessibility Links
  • मराठी
बंद

नागरी दलित वस्ती सुधारणा योजना अंतर्गत प्राप्त अनुदानाच्या अनुषंगाने दयावयाच्या प्रशासकीय मान्यतेबाबत करावयाची कार्यवाही.

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे 1.   नगरपरिषदांकडून सदर विषयाबाबतचा प्रस्ताव.
2.   प्रस्तावित कामासाठी शासनाच्या इतर कोणत्याही योजने अंतर्गत अर्थ सहाय घेतले नसल्याबाबतचे प्रमाणपत्र
3.   प्रस्तावातील काम ज्या जमिनीवर घ्यावयाचे आहे ती जमिन नगरपरिषद/महानगरपालिकेच्या ताब्यात असल्याचे प्रमाणपत्र.
4.   प्रस्तावित कामाची निवड व निश्चिती करणारा नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्वसाधारण सभेचा ठराव.
5.   प्रस्तावित काम हे ज्या वस्तीतील अनुसूचित जाती व नवबौध्द (विशेष घटक) यांची लोकसंख्या 50% किंवा त्यापेक्षा अधिक आहे अथवा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या प्रभागातीलच असल्याबाबतचे मुख्याधिकारी यांचे प्रमाणपत्र.
6.   सक्षम प्राधिकाऱ्याकडून प्राप्त झालेल्या तांत्रिक मान्यतेच्य आदेशाची प्रत.
7.   बांधकाम विषयक काम असल्यास नगररचना शाखेकडून प्रस्तावित कामाच्या रेखांकन नकाशांना मंजूरी प्राप्त झाल्याच्या आदेशाची प्रत.
8.   मागील आर्थिक वर्षामध्ये प्राप्त झालेल्या निधीचा पुर्णपणे विनियोग करुन त्याचे विनियोग प्रमाणपत्र
9.   प्राप्त अनुदानाच्या आदेशाची प्रत.
10.   सदर अनुदानातून यापूर्वी घेतलेली प्रशासकीय मान्यता दिनांक व रक्कम झालेला खर्च या बाबतची माहिती दर्शविणारे विवरणपत्र.
11. प्रस्तावित कामाचे नावात जीपीएस लोकेशन अंर्तभुत करुन त्‍याबाबतचे फोटो प्रस्तावासोबत सादर करणे

संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग यांचेकडील शासन निर्णय क्र. विघयो-102000/1592 प्र.क्र. 189/नवि-4 दि. 5/3/2002.

निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी मुद्या क्र.2 मधील नमुद आवश्यक कागदपत्रांची छाननी करुन नागरी दलित वस्ती सुधारणा योजना अंतर्गत प्राप्त अनुदानाच्या अनुषंगाने प्रशासकीय मान्यतेबाबत कार्यवाही करणेत येते.

ऑनलाईन सुविधा आहे का – नाही
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क

शुल्क असल्यास भरण्याची पद्धत

निर्णय घेणारे अधिकारी – जिल्हाधिकारी वर्धा
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – 15 दिवस

ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://grievances.maharashtra.gov.in
कार्यालयाचा पत्ता जिल्हा सह आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा
संपर्क दुरध्वनी क्रमांक 7152 – 250030

संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी mawardha99@gmail.com