प्रकल्प संचालक आदिवासी विकास प्रकल्प
समाज कल्याण संचालनालयाची निर्मिती व पूर्वेतिहास
आदिवासींच्या कल्याणाच्या योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी सन १९७२ मध्ये समाजकल्याण विभागांतर्गत आदिवासी विकास संचलनालयाची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर १९७६ साली आदिवासी विकास आयुक्तालय सुरु करण्यात आले. दि. २२ एप्रिल १९८३ रोजी स्वतंत्र आदिवासी विकास विभागाची स्थापना करण्यात आली आणि १९८४ पासून आदिवासी विकास विभाग स्वतंत्रपणे कार्यरत आहे. आदिवासी विकास विभागाच्या बळकटीकरणाकरिता सन १९९२ मध्ये आदिवासी विकास संचलनालय हे आदिवासी विकास आयुक्तालयात विलीन करण्यात आले.
आदिवासी विकास विभागांतर्गत ठाणे, नाशिक, अमरावती व नागपूर येथे चार अपर आयुक्त व २९ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालये असून त्यांच्या मार्फत मागासवर्गीय कल्याणाच्या राज्य व केंद्र शासनाच्या योजनांची अंमलबजावणी केली जाते. या योजनांतर्गत सामाजिक कल्याण, आर्थिक कल्याण, शिक्षणामध्ये प्रगती, सामाजिक न्याय, महिला व बाल विकास, आरोग्य, पोषण, रोजगार इ. बाबतच्या योजना राबविण्यात येतात. सन २०१५-१६ च्या अर्थसंकल्पामध्ये आदिवासी विकास विभागाकरिता रु. 5170 कोटी इतका नियतव्यय मंजूर आहे.
योजना
अनु.क्रमांक | योजना |
---|---|
1 | जिल्हा वार्षिक आदिवासी घटक योजना — राज्य योजना |
2 | सुवर्णा महोत्सवी पूर्व मॅट्रिक शिष्यवृत्ती–राज्य योजना / जिल्हा परिषद अंमलबजावणी |
3 | एस.टी.विद्यार्थ्यांना मॅट्रिक नंतरची शिष्यवृत्ती– केंद्रीय योजना |
4 | पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना– राज्य योजना |
5 | शासकीय आश्रम शाळा — राज्य योजना |
6 | आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह– राज्य योजना |
7 | अनुदानित आश्रमशाळेत शिक्षण–राज्य योजना |
8 | नामांकित शाळा –राज्य योजना |
9 | ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना — राज्य योजना |
10 | केंद्रक बजेट — राज्य योजना |
11 | स्वाभिमान योजना — राज्य योजना |
12 | धारामित्र- परसातील कुक्कुटपालन व शेळीपालन (मध्यवर्ती योजना) च्या सुधारित पद्धतींच्या माध्यमातून कोलम समुदायाच्या रोजीरोटीच्या संधींचा विकास करणे.(केंद्रीय योजना) |
अधिक माहितीसाठी
दूरध्वनी क्रमांक
प्रकल्प संचालक आदिवासी विकास –९४०४४८०२४५