भूसंपादन नाहरकत दाखला देणे
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | 1. सेतू कार्यालयातून अर्जाचा नमुना घेणे (5 रु. चे कोर्ट फी स्टॅम्पसह) 2. अर्जासमवेत चालू 7/12 उतारा, आवश्यक असल्यास संबंधितांचे जनरल मुखत्यार पत्र, 8अ उतारा इ. 3. भूसंपादन कायदा कलम 4(1)/9(3)(4)/12(2) यापैकी जी उपलब्ध असेल त्या नोटीसीची प्रत. |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) यांचे कार्यालयातील अभिलेख |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | 1. विहीत नमुन्यातील अर्जाबरोबरच प्राप्त झालेल्या चालू 7/12 उतारा पाहून सदर उताऱ्यावर भूसंपादनाबाबतची नोंद आहे किंवा कसे याबाबत खात्री करणे. 2. उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) सर्व व संबंधित तालुक्याचे उपविभागीय अधिकारी यांना पत्र देऊन अर्जदार यांनी अर्जात नमूद केलेल्या गावातील गट नंबर व क्षेत्र याबाबत भूसंपादनाची कार्यवाही चालू अथवा प्रस्तावित आहे किंवा कसे याबाबतचा अहवाल पत्र दिलेपासून 8 दिवसाचे आत प्राप्त करुन घेणे. 3. वर नमूद कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या नाहरकत दाखल्यांची पडताळणी करणे. |
ऑनलाईन सुविधा आहे का – | नाही |
असल्यास सदर लिंक – | — |
आवश्यक शुल्क | 22 रु. 47 पै |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | ई-सेवा केंद्रामध्ये रोख स्वरुपात |
निर्णय घेणारे अधिकारी – | संबंधित कार्यालयाचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | 30 दिवस |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | https://grievances.maharashtra.gov.in |
कार्यालयाचा पत्ता | विशेष भूसंपादन अधिकारी उर्ध्व वर्धा प्रकल्प वर्धा |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | 07152 -241956 |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | laooicwardha@gmail.com |