बंद

भोगवटदार वर्ग-2 म्हणून धारण केलेल्या अकृषिक भूखंडाची अनधिकृत विक्री नियमाधीन करणे.

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे 1.     अर्जदार यांचा अर्ज.
2.     अर्जदार यांचे मालमत्ता पत्रक
3.     मंडळ अधिकारी यांचा स्थळनिरीक्षण पंचनामा व तपासणी सूचीनूसार जबाब
4.     उपवनसंरक्षक यांचे अभिप्राय.
5.     कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे बांधकामाचे मुल्यांकन
6.     सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी किंवा दुय्यम निबंधक यांचे मोकळया जागेचे मुल्यांकन.
7.     अनअर्जित उत्पन्नाची रक्कम भरणेस तयार असलेबाबत अर्जदार यांचे प्रतिज्ञापत्र इ.

संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) 1.महाराष्ट्र जमीन महसूल नियम पुस्तिका खंड-दोन, परिच्छेद 86.
2.शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र. जमीन-10/2002/प्र.क्र.207/ज-1, दि.29/5/2006.
3.शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र. जमीन-11/2007/प्र.क्र.98/ज-1 दि. 31/12/2007.

निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी 1.     अर्जदार यांचाअर्ज
2.     तहसिलदार/ उपविभागीय अधिकारी यांचा अहवाल.
3.     प्रस्तावाची छानणी अंती खालील बाबींची खात्री करणे.
·      अर्जदार यांचे मालमत्ता पत्रक
·      मंडळ अधिकारी यांचा स्थळनिरीक्षण पंचनामा, तपासणीसूचीनूसार जबाब.
·      उपवनसंरक्षक अहमदनगर यांचे अभिप्राय.
·      कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेकडील बांधकामाचे मुल्यांकन.
·      सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी किंवा दुय्यम निबंधक यांचे मोकळया जागेचे चालु बाजारभावानुसार मुल्यांकन
·      अनार्जित उत्पन्नाची रक्कम भरणेस तयार असलेबाबत अर्जदार यांचे प्रतिज्ञापत्र
4.     वरील बाबींची पुर्तता झाल्याची खात्री करुन अर्जदार यांचे अर्जाचे अनुषंगाने जिल्हाधिकारी / अपर जिल्हाधिकारी यांचेकडे टिपणी सादर करणे. टिपणी मंजूर झालेनंतर अर्जदार यांस अनार्जित उत्पन्नाची रक्कम चलनाने सरकार जमा करणेबाबत कळविणे.
5.     अर्जदार यांनी अनार्जित उत्पन्नाची रक्कम चलनाने सरकार जमा केलेनंतर भोगवटदार वर्ग 2 म्हणून धारण केलेल्या अकृषिक भूखंडाची अनधिकृत विक्री नियमाधीन करणेबाबत अंतिम आदेश पारीत करणे.

ऑनलाईन सुविधा आहे का – नाही
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क

शुल्क असल्यास भरण्याची पद्धत

निर्णय घेणारे अधिकारी – जिल्हाधिकारी/अपर जिल्हाधिकारी

निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – कागदपत्रांच्या पुर्ततेनंतर 45 दिवस

ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक dcgenwardha@gmail.com या वर तक्रार दाखल करता येते.

कार्यालयाचा पत्ता जिल्हाधिकारी कार्यालय, सेवाग्राम रोड, सिवील लाईन्स, वर्धा

संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-243446

संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी dcgenwardha@gmail.com