बंद

महानगरपालिका/नगरपालिका हद्दीतील शेत जमिनीच्या विकास परवानगी संदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र देणे.

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे 1.     विहीत नमुन्यातील अर्ज.
2.     अर्जदाराचा जातीचा दाखला
3.     उपविभागीय स्तरीय वनहक्क समितीचा आदेश / सभेच्या ठरावाची प्रत.
4.     ग्रामस्तरीय वन हक्क समितीचा ठराव
5.     वनपाल यांचा नमुना अ मधील अभिप्राय
6.     उपवनसंरक्षक/उपविभागीय वन अधिकारी यांचा अभिप्राय
7.     जेष्ठ नागरीक यांचा विहित नमुन्यातील जबाब
8.     कामगार तलाठी यांचा रहिवासी दाखला
9.     रेशनकार्ड झेरॉक्स
10. मतदान ओळखपत्र
11. लाभार्थी / अर्जदार सदरस जागेवर ताबा असल्याबाबत शासकिय पुरावा.
12. तलाठी, ग्रामसेवक, वनपाल यांचा संयुक्त पंचनामा
13. वंशावळ प्रतिज्ञापत्र
14. संबंधीत गटाचे 7/12 पिकपाहणी उतारे, फेरफार उतारे, कबुलायत, वन विभागाचा एकसाली करारपत्र
15. संबंधीत गटाचा जी.पी.एस. मोजणी नकाशा
16. अर्जदारांची इतर ठिकाणी असलेल्या खाजगी जमिनीबाबत 8 अ उतारे
17. अर्जदार अनुसूचित जमातीचा असेल तर 2005 पूर्वीचा सदर जागेवर ताबा असल्याबाबत पुरावा.
18. अर्जदार पारंपारिक वन निवासी असेल तर तीन पिढ्यांचा (75 वर्षे) सदर जागेवर ताबा असल्याबाबत पुरावा.
19. अधिनियमातील तरतुदी नुसार इतर पुरावे.

संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी वनहक्काची मान्यता अधिनियम 2006, नियम 2008 व सुधारणा नियम 2012 चे भारत राजपत्र दि. 2 जानेवारी 2007.

निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी 1.     अर्जदार आदिवासी असल्यास दि. 13/12/2005 पुर्वी वनजमिनीवर अतिक्रमण असलेबाबत पुरावा व दि. 31/12/2007 रोजी प्रत्यक्षात वहिती असलेबाबत सबळ पुरावे तसेच सॅटेलाईट इमेजवर पहाणी करणे.
2.     अर्जदार बिगर आदिवासी असल्यास 13 डिसेंबर 2005 पुर्वी किमान तीन पिढयांपासून मुख्यत्वे करुन वनात राहणारा आणि उपजीवीकेच्या खऱ्याखुऱ्या गरजांसाठी वनांवर किंवा वन जमिनीवर अवलंबून असणारा कोणताही सदस्य किंवा समाज, असा आहे –
स्पष्टीकरण – या खंडाच्या प्रयोजनार्थ ‘पिढी’ याचा अर्थ पंचवीस वर्षाचा कालखंड असा आहे.
3.     अर्जदार याचया भारत सरकार जमाती कार्य मंत्रालय जोडपत्र 1 नियम 6 (झ) अन्वये विहित नमुन्यातील परिपुर्ण अर्ज
4.     अर्जदाराचा उपविभागीय अधिकारी यांनी दिलेला जातीचा दाखला (आदिवासी किंवा बिगर आदिवासी पहाणे करीता) तपासणे.
5.     उपविभाग स्तरीय वनहक्क समितीचा आदेशाची तपासणी करणे.
6.     ग्रामसभा ठरावाची विहित नमुन्यातील शिफारस आहे काय याची खात्री करणे.
7.     वनपाल यांची नमुना 12(1) अ नुसार क्षेत्रिय तपासणी व चौकशी पुर्ण झाल्यानंतर त्याबाबतीत संबंधीत अधिकाऱ्यांचे म्हणणे वनाधिकार समितीला कळविण्याबाबतचा अहवाल नमुना – (नमुना अ मधील अभिप्राय) परिपुर्ण भरलेला आहे काय ? याची खात्री करुन घेणे.
8.     उपवनसंरक्षक/उपविभागीय वनअधिकारी यांचा दि. 13/12/2005 पुर्वी ताबा असलेबाबत व दि. 31/12/2007 रोजी प्रत्यक्षात वहिती असलेबाबत अभिप्राय असे आवश्यक आहे.
9.     अर्जदार स्थानिक रहिवासी असून तो पुर्वीपासून वनजमिनीवर अतिक्रमण करुन राहत असलेबाबतचा जेष्ठ नागरीक यांचा विहित नमुन्यातील जबाब तपासणी करणे
10. अर्जदार हे स्थानिक रहिवासी कुटुंबातील कामगार तलाठी यांचा रहिवासी दाखला
11. वन जमिनीवर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांबाबत रेशनकार्ड झेरॉक्स प्रत.
12. अर्जदार हे स्थानिक रहिवास असलेबाबत मतदान ओळखपत्र
13. कामगार तलाठी, ग्रामसेवक, वनपाल, सरपंच यांचा वन जमिनीवर अतिक्रमण असलेबाबतचा संयुक्त स्थळनिरीक्षण पंचनामा
14. तीन पिढयांचा बाबत वंशावळ प्रतिज्ञापत्र तपासणी करणे
15. संबंधीत गटाचे 7/12 पिकपाहणी उतारे, फेरफार उतारे कबुलायत, वन विभागाचा एकसाली करारपत्र, तपासणी करणे.
16. अर्जदार यांचे गावात/इतर ठिकाणी असलेल्या खाजगी जमिनीबाबत 8अ उतारे तपासणी करणे
17. संबंधीत गटाचे वनपाल यांनी जी पी एस यंत्राणेने मोजणी केलेले मोजणी नकाशे तपासणी करणे
18. जी.पी.एस. मोजणी झालेल्या क्षेत्राचे उपग्रहीय नकाशे पडताळणी करणे
19. जिल्हास्तरीय वनहक्क समितीची बैठक आयोजित करुन प्राप्त अर्ज जिल्हास्तरीय वनहक्क समिती समोर सादर करणे.
20. जिल्हास्तरीय वनहक्क समितीने अर्जदार यांना मंजूर केलेले क्षेत्राची उप अधीक्षक भूमि अभिलेख कडे मोजणी करणेकामी पाठविणे व मोजणी नकाशे प्राप्त करुन घेणे
21. मोजणी झालेल्या क्षेत्राचे संबंधीत तालुक्यामार्फत तलाठी यांना 7/12 वर इतर अधिकारात अंमल घेणेबाबत कळविणे व पट्टे वाटप करणे

ऑनलाईन सुविधा आहे का – नाही
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क

शुल्क असल्यास भरण्याची पद्धत

निर्णय घेणारे अधिकारी – 1. मा. जिल्हास्तरीय साहेब
(जिल्हास्तरीय वनहक्क समिती अध्यक्ष)
2. मा. उपजिल्हाधिकारी महसूल
(जिल्हास्तरीय वनहक्क समिती सदस्य सचिव)
3. मा. उपवनसंरक्षक
(जिल्हास्तरीय वनहक्क समिती सदस्य)
4. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्प
(जिल्हास्तरीय वनहक्क समिती सदस्य)

निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – 7 दिवस

ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक dcgenwardha@gmail.com या वर तक्रार दाखल करता येते.

कार्यालयाचा पत्ता जिल्हाधिकारी कार्यालय, सेवाग्राम रोड, सिवील लाईन्स, वर्धा

संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-243446

संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी dcgenwardha@gmail.com