शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद
योजना
अनु.क्र. | योजना | संक्षिप्त |
---|---|---|
१ | अल्पसंख्यांक प्रीमॅट्रीक शिष्यवृत्ती योजना | अल्पसंख्यांक समाजाच्या कल्याणासाठी समाजातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी सदर योजना 23 जुलै 2008 चे शासन निर्णयानुसार सन 2008-09 पासून राज्यात राबविण्यात येत आहे. केंद्र शासन पुरस्कृत योजना असुन यामध्ये मुस्लिम, ख्रिश्चन, शिख, पारशी, बौध्द व जैन या अल्पसंख्यांक समाजातील इयत्ता 1 ली ते 10 वी तील विद्यार्थी अर्ज सादर करु शकतात. शिष्यवृती धारक मंजुर संचानुसार विद्यार्थ्याच्या याद्या जिल्हयातील सर्व गट शिक्षणाधिकारी, पंचायत समितींकडे गोषवा-यासह सादर करण्यात आलेल्या असुन शिष्यवृती धारक विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते काढून ऑन लाईन यादी मा. शिक्षण संचालक पुणे यांचे कडे सादर करण्यात आली. व त्यांचे स्तरावरुन पात्र विद्यार्थ्यांचे खात्यात DBT अंतर्गत रुपये 1,000/- प्रमाणे शिष्यवृत्ती जमा करण्यात येते. |
२ | राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा (NTS) | इ. १० वी च्या अखेर प्रज्ञावंत विद्यार्थ्याचा शोध घेवून बुध्दामान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थीक साहाय्य करावे, व या साहाय्यातून त्याची बुध्दीमत्ता विकसीत व्हावी हे योजनेचे उदिष्टे आहे. महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शाळेतील इयत्ता 10 वी मध्ये शिकत असलेल्या नियमित विद्यार्थी/विद्यार्थीनीस राज्यस्तर परीक्षेस बसता येते. त्यासाठी वयाची, उत्पन्नाची अगर किमान गुणांची अट नाही. तसेच कोणतीही पूर्व परीक्षा देण्याची अट नाही. जे विद्यार्थी 10 वी चे परीक्षेला पहिल्यांदाच बसत आहेत, तेच विद्यार्थी सदर परिक्षेला आवेदन करू शकतात. |
३ | राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (NMMS) | इ. ८ वी च्या अखेर आर्थीक दृष्टया दुर्बल घटक विद्यार्थ्याचा शोध घेवून बुध्दामान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थीक साहाय्य करावे, व या साहाय्यातून त्याची बुध्दीमत्ता विकसीत व्हावी हे योजनेचे उदिष्टे आहे. महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इ. 7 वी मध्ये किमान 55% गुण मिळवून उत्तीर्ण होऊन इयत्ता 8 वी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी/ विद्यार्थीनीस या परीक्षेला बसता येते. पालकांचे वार्षिक उत्पन्न 1,50,000/- पेक्षा कमी असणा-या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे शिष्यवृत्ती दरमहा 1,000/- प्रमाणे विद्यार्थ्याच्या खात्यात DBT अंतर्गत इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंत दरवर्षी रू.१२०००/- शिष्यवृत्ती दिल्या जाते. |
४ | इन्स्पायर अवार्ड मानक योजना | सन 2009-10 पासून भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने इन्स्पायर अवार्ड योजनेची सुरुवात केली. याचा मुख्य उद्येश किशोरावस्था (वर्ग 6 ते 10 पर्यंतचे विद्यार्थी) मधील प्रतिभाशाली विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करुन विज्ञानाकडे आकर्षित करणे हा आहे. या मध्ये देशातील सर्व मान्यता प्राप्त शाळांच्या विद्यार्थ्यांच्या सर्वोत्तम नविन विचारांना/नवाचारांना (Innovation) आमंत्रित करण्यात येते. भारत सरकारच्या E-MIASपोर्टलवर www.inspireawards-dst.gov.in विद्यार्थी नामांकन करु शकतात. त्यापैकी काही निवडक नामांकनांना 10,000/- रुपयाचे पुरस्कार राशी प्रत्यक्ष DBT अंतर्गत त्यांचे खात्यात जमा करण्यात येते व सदर प्रकल्प / प्रतिकृती जिल्हास्तरीय प्रदर्शनात प्रदर्शित केल्या जातात. त्यातुन एकूण संख्येच्या १० % विद्यार्थ्यांची निवड राज्यस्तर प्रदर्शनाकरीता केली जाते. |
५ | अत्यंत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक सुविधा | अत्यंत अडचणीत असलेल्या शेतक-यांच्या पाल्यांना शैक्षणिक सुविधा मिळणेकरीता मा. जिल्हाधिकारी यांचे कडून प्रस्ताव मंजूरी नंतर लाभ देण्यात येतो. |
६ | उच्च प्राथमिक शाळा शिष्यवृत्ती PUP (इयत्ता ५ वी) | सर्व शासन मान्य शाळेतील इ. ५ वी तील विद्यार्थी सदर शिष्यवृत्ती परिक्षेकरीता शाळेमार्फत आनॅलाईन अर्ज करू शकतात. शालेय शिक्षण व क्रिडा विभाग शासन निर्णय दिनांक 22/7/2010 अन्वये संचालनालयाच्या स्तरावरुन उच्च प्राथ. व माध्य. शिष्यवृत्तीची रक्कम बँकेमार्फत शिष्यवृत्तीधारकांच्या बँक खात्यावर सन 2010-11 पासून जमा करण्यात येत आहे. |
७ | माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती RSS (इयत्ता ८ वी) |
सर्व शासन मान्य शाळेतील इ. ८ वी तील विद्यार्थी सदर शिष्यवृत्ती परिक्षेकरीता शाळेमार्फत आनॅलाईन अर्ज करू शकतात. शालेय शिक्षण व क्रिडा विभाग शासन निर्णय दिनांक 22/7/2010 अन्वये संचालनालयाच्या स्तरावरुन उच्च प्राथ. व माध्य. शिष्यवृत्तीची रक्कम बँकेमार्फत शिष्यवृत्तीधारकांच्या बँक खात्यावर सन 2010-11 पासून जमा करण्यात येत आहे. दि.22/7/2010 अन्वये संचालनालयाच्या स्तरावरुन उच्च प्राथ. व माध्य. शिष्यवृत्तीची रक्कम बँकेमार्फत शिष्यवृत्तीधारकांच्या बँक खात्यावर सन 2010-11 पासून जमा करण्यात येत आहे.दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा फी योजनेमध्ये फक्त OPEN, OBC विद्यार्थ्यांचे नांवे दर्शविण्यात आलेली आहेत. SC/NT/VJNTचे विद्यार्थ्यांचे प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडून व STचे विद्यार्थ्यांचे प्रस्ताव आदिवासी विकास विभागाकडून मंजूर केल्या जातात. विभागीय मंडळाला अहवाल सादर करण्यात येत असून शासनाकडून अनुदान प्राप्त झाल्यानंतर शाळेमार्फत वाटप करण्यात येते. |
८ | टंचाई ग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे पालकांना फी माफीची सवलत देणे | दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा फी योजनेमध्ये फक्त OPEN, OBC विद्यार्थ्यांचे नांवे दर्शविण्यात आलेली आहेत. SC/NT/VJNTचे विद्यार्थ्यांचे प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडून व STचे विद्यार्थ्यांचे प्रस्ताव आदिवासी विकास विभागाकडून मंजूर केल्या जातात. विभागीय मंडळाला अहवाल सादर करण्यात येत असून शासनाकडून अनुदान प्राप्त झाल्यानंतर शाळेमार्फत वाटप करण्यात येते |
अधिक माहितीसाठी
दूरध्वनी क्रमांक
जिल्हा परिषद –०७१५२-२४०२३१