बंद

सहकारी गृहनिर्माण संस्थांचे मानीव अभिहस्तांतरण करणे.

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे मानीव अभिहस्तांतरणासाठी करावयाच्या ऑनलाईन व ऑफलाईन (Hard Copy) अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे :-
1) ऑनलाईन (Online) अर्जासोबत अपलोड (Upload) करावयाची कागदपत्रे
1) मानवी अभिहस्तांतरणाकरिता नमुना 7 मधील अर्ज. (परिशि ष्ट-1 प्रमाणे)
2) सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणी प्रमाणपत्र/कंपनी नोंदणी प्रमाणपत्र/डीड ऑफ डिक्लेरेशनची प्रत.
3) अर्जदार संस्थेचा तपशील व संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा/विशेष सर्वसाधारण सभांमध्ये मानीव अभिहस्तांतरण करण्यासंदर्भात केलेल्या ठरावाची प्रत.
4) मिळकत पत्रिकाचा तीन महिन्याच्या आतील उतारा. (मालमत्ता पत्रक 7/12 उतारा इ.)
5) संस्थेतील सर्व कायदेशीर सदनिका धारकांची विहित नमुन्यातील यादी.
6) सहकारी गृहनिर्माण संस्थेने मानवी अभिहस्तांतरण करुन देण्यासाठी महाराष्ट्र वेश्म अधिनियम, 1970 अन्वये प्रवर्तकाला बजावलेली कायदेशीर नोटीस.
7) नियोजन/सक्षम प्राधिकरणाने दिलेले बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र तसेच भोगवटा प्रमाणपत्र.
8) सबंधित संस्थेकडे भोगवटा प्रमाणपत्र नसल्यास इमारतीचा प्रत्यक्ष ताबा घेण्यात आल्याचे तसेच सदर इमारतीच्या संदर्भात असलेल्या सर्व जबाबदा-या/दायित्वे स्किारण्यास तयार असल्याचे तसेच मानीव अभिहस्तांतरण झाल्यानंतर सबंधीत नागरी स्थानिक
स्वराज्य संस्थेकडे भोगवटा प्रमाणपत्रासाठी अर्ज करणार असल्याबाबत स्व-प्रमाणपत्र घेण्यात यावे. (परिशिष्ट-5 प्रमाणे)
9) रु. 2000/- ची कोर्ट फी स्टॅम्प किंवा ऑनलाईन फी
10) संस्थेची कागदपत्रे खरी असल्याबाबत अर्जदाराचे स्वप्रतिज्ञापत्र (परिशिष्ट-4 प्रमाणे)
2) ऑफलाईन अर्जासोबत (Hard Copy) जोडावयाची कागदपत्रे :-
1) मानवी अभिहस्तांतरणाकरिता नमुना 7 मधील अर्ज (वर नमुद केल्याप्रमाणे मुद्रांक शुल्कासह)
2) मानीव अभिहस्तांतरण क्रमांक (D.C.No.) प्राप्त झाल्यास नमुना क्र.7 ची प्रत
3) संस्थेतील एका सभासदाच्या सदनिकेच्या विक्री करारनाम्याची प्रत व इंडेक्स 2 किंवा सदनिकेच्या मालकी हक्काचा पुराव जसे वारस प्रमाणपत्र, न्यायालयाचा हुकुमनामा किंवा मृत्यूपत्र इत्यादी.
4) विकासकाने मंजुर करुन घेतलेल्या रेखांकन (Layout) ची सक्षम प्राधिकरणाकडील अंतिम मंजुर नकाशा प्रत.

संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिकांबाबत (त्या बांधण्यास प्रोत्साहन देणे, त्याची विक्री, व्यवस्थापन व हस्तांतरण यांचे नियमन करण्याबाबत) अधिनियम 1963, नियम 1964 व महाराष्ट्र शासन, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, शासन निर्णय क्रमांक सगृयो-2017/प्र.क्र.192/14-स, दिनांक 22 जुन, 2018
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी अधिनियम, नियम व शासन निर्णयानुसार आवश्यक असलेल्या कागदपत्राची छाननी करणे.
ऑनलाईन सुविधा आहे का – होय
असल्यास सदर लिंक – https;//aaplesarkar.mahaonline.gov.in/en
आवश्यक शुल्क 2000/-
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत कोर्ट फी स्टॅम्प किंवा ऑनलाईन फी
निर्णय घेणारे अधिकारी – जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – 6 महिने
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक
कार्यालयाचा पत्ता जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वर्धा यांचे कार्यालय,केशरीमल शाळेसमोर, सुदामपुरी, वर्धा.
संपर्क दुरध्वनी क्रमांक (07152)255756
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी ddr_wda@rediffmail.com