बंद

5% दिव्यांग कल्याण वैयक्तिक लाभ योजना

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे “१)अर्जदार यांचा ग्रामपंचायत रहिवासी दाखला.
२)अर्जदाराचे शाळा सोडण्याचा दाखला.
३) अर्जदाराचे दिव्यांगत्वाचे प्रमाण 40% किंवा त्यापेक्षा जास्त असल्याचे शासकीय शल्य चिकित्सक यांचे प्रमाणपत्र
४)अर्जदाराचे रु.50,000/- पर्यंत वार्षिक उत्पन्न असल्याचे सक्षम प्राधिका-याने निर्गमित केलेला उत्पन्नाचा दाखला.
५) आधार कार्ड
६)आधार संलग्नित बँकेचे पासबुक..
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) “१) ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्र.जिपऊ2018/प्र.क्र.54/वित्त-3 दि.25/06/2018
२) नियोजन विभाग शा.नि.क्र.डीसीटी 2316/प्र.क्र.133/का.1417 दि.05/12/2016
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी “१)अर्जदार यांचा अर्ज
२) त्या अनुषंगाने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तपासणी
३)अर्जदाराचे शपथपत्र
४)अर्जदाराने यापूर्वी पंचायत समिती/समाज कल्याण विभागांतर्गत योजनेचा लाभ घेतलेला नाही याबाबतचे सचिव/ग्रामविकास अधिकारी यांचे शिफारस पत्र
५)सदर अर्जदाराची निवड ग्रामसभेत झाल्याबद्दल ग्रामविकास अधिकारी/ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र
६)अर्जदाराने सर्व अटीची पूर्तता करून मागील 3 वर्षात सदर योजनेचा लाभ देण्यात आला नसल्याबाबतचे गट विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र.
ऑनलाईन सुविधा आहे का –
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत
निर्णय घेणारे अधिकारी – 1)समाज कल्याण समिती ,जिल्हा परिषद ,वर्धा
2) मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प. वर्धा

निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – “१)सदर योजनेंतर्गत जि.प.स्वउत्पन्नाचा 5% निधी दिव्यांग प्रवर्गाच्या कल्याणकारी योजनांवर खर्च करण्यात येते.सदर योजना 100% अनुदानित आहे.
२) सदर योजनेंतर्गत पंचायत समिती मार्फत अर्ज कार्यालय ,जिल्हा समाज कल्याण अधिकारी,जि.प.वर्धा यांचेकडे स्वीकारण्यात येतात.
३) पात्र/अपात्रतेची यादी तयार करण्यात येते.
४)पात्र लाभार्थ्यांची यादी समाज कल्याण समिती सभेत सादर करण्यात येते.
५) समाज कल्याण समिती द्वारे उद्दिष्टांच्या अनुषंगाने तालुकानिहाय लाभार्थ्यांची निवड करण्यात येते.
६) निवड झालेल्या लाभार्थ्यास पत्राद्वारे कळविण्यात येते
७)लाभार्थ्यांची ज्या साहित्यासाठी निवड झालेली आहे त्या साहित्यासाठी मंजूर केलेली रक्कम DBT द्वारे लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँकखात्यात जमा करण्यात येते.
८) साहित्याची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा झाल्यानंतर 2 महिन्याच्या आत लाभार्थ्याने साहित्याची खरेदी करून त्यासंबंधीचे देयक पंचायत समितीस सदर करणे बंधनकारक आहे.
९) सदर प्रक्रिया किमान 02 ते 03 महिन्यात पुर्ण होते.”

ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://grievances.maharashtra.gov.in/
कार्यालयाचा पत्ता जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सिविल लाईन वर्धा

संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-242783
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी dswozpwardha@gmail.com