प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | मिळणारा लाभ १) कुटुंबातील पहिल्या खेपेतील गरोदर मातेला व तीच्या जिवंत अपत्याला हा लाभ तीन टप्प्या मध्ये एकूण रुपये 5000 लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केला जातो. (राज्य शासनमध्ये व सार्वजनिक उपक्रमामध्ये काम करणा-या मातृत्व रजेचा लाभ मिळण-या मातांना वगळून सर्व पहील्या खेपेच्या मातांना लाभ् दिला जातो) लाभ द्यावयाचे टप्पे 1) पहीला हप्ता – रु.1000 /-मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून 150 दिवसात गर्भधरण नोदणी केल्यानंतर प्राप्त होईल. 2) दुसरा हप्ता – रु.2000/किमान एकदा प्रसवपुर्व तपासणी केल्यास गर्भधारणेचे सहा महीने पुर्ण झाल्यावर दुसरा हप्ता लाभार्थीच्या खत्यात जमा केला जाईल. 3) तिसरा हप्ता – रु. 2000/- – प्रसुती नंतर झालेल्या अपत्याचे जन्म नोदणी व बालकास (साडेतीन महीण्यात) बीसीजी ओपीव्ही आणि हेप्याटायटीस बी वा त्या अनुषंागीक ख्ुराक दिल्यानंतर तीसरा हप्ता लाभार्थीच्या खत्यात जमा केला जाईल. लागणारी कागदपत्रे. 1) माताबाल संगोपन कार्ड 2) लाभार्थी आधार कार्ड 3)लाभार्थी आधार संलग्ण बॅंक खाते पासबुक झोरॉक्स 4) बाळाच्या जन्माच्या दाखल्याची झोराॅक्स प्रत 5)पतीचे आधार कार्ड |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | 1) महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शसन निर्णय क्र. मासका-2017 / प्र.क्रं.49 3/क.क. दिनांक 08 डिसेंबर 2017 |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | जिल्हास्तरावरुन सर्व तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील भरलेल्या लागिन आयडी वरुन कामाचे मुल्यमापन केले जाते. तसेच प्रभावी अंमलबजावणी केली जाते. |
ऑनलाईन सुविधा आहे का – | नाही |
असल्यास सदर लिंक – | — |
आवश्यक शुल्क | — |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | — |
निर्णय घेणारे अधिकारी – | तालुका आरोग्य अधिकारी |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | 30 दिवस |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | helpline 104 / https://grievances.maharashtra.gov.in/mr |
कार्यालयाचा पत्ता | तालुका आरोग्य अधिकारी |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | संबंधीत तालुका आरोग्य अधिकारी आरोग्य कर्मचारी / आषा वर्कर |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | संबंधीत तालुका आरोग्य अधिकारी कार्यलयाचा ईमेल आयडी |