आस्थापना
सामान्य आस्थापना
- गट क व गट ड संवर्गासाठी निवड झालेल्या नवनियुक्त उमेदवाराना नियुकत्या देणे.
- अनुकंपधारकांची जेष्टता यादी तसेच उमेदवारांना नियुक्ती देणे.
- बिंदुनामावली तयार करणे
- जेष्टता यादी तयार करणे
- कर्मचा-याच्या नियुक्त्या तसेच सेवाविषयक बाबीसंबंधी दाखल न्यायालयीन प्रकरणे हाताळणे.
- आंतरजिल्हा बदलीसंबंधीच्या नस्ती हाताळणे.
- कर्मचा-यांवर शिस्तभंगाची कार्यवाही करणेसंबंधीच्या गट क व गट ड संवर्गातील नस्ती.
- लाचलुचपत प्रकरणासंबंधी कार्यवाही करणे.
- स्वेच्छानिवृत्ती अर्जावरील प्रकरणात कार्यवाही करणे.
- गट क व गट ड संवर्गाची सरळसेवा भरती प्रक्रियेबाबत कार्यवाही करणे.
- विधी अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कंत्राटी भरती प्रक्रियेबाबत संपूर्ण कार्यवाही करण्यात येवुन नियुक्ती आदेश निर्गमित करणे.
- वाहन चालक व शिपाई सरळसेवा भरती प्रक्रियेबाबत संपूर्ण कार्यवाही करण्यात येवुन नियुक्ती आदेश निर्गमित करणे.
- घरबांधणी अग्रिम, मोटार सायकल अग्रिम, संगणक अग्रिम इत्यादी अग्रिम मंजुर करणे तसेच नोदवहया अदयावत करणे.
- विभागीय दुय्यम सेवा परिक्षा व महसुल अर्हता परिक्षा कार्यवाहीबाबतची नस्ती.
- मा.जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांचे वापरातील वाहनाचे तसेच क्षेत्रीय अधिकारी यांचे वाहन दुरूस्ती, इंधन-वंगन देयके मंजुरीसाठी सादर करणे.
- मा. जिल्हाधिकारी यांचे अधिकारातील तिन सुटटी मंजुरी करणेबाबत नस्ती.
- अधिकारी/कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाबाबत नस्ती.
- अपंग अधिकारी/कर्मचारी यांची वाहतुक भत्ता मिळणे व व्यवसाय करातुन सुट मिळणेबाबत नस्ती.
- अधिकारी/कर्मचारी यांना अतिरीक्त मेहनताना (विशेष वेतन) प्रस्ताव तपासणी करून मंजुरी करीता सादर करणे.
- मुख्य लेखाशिर्ष 7610 अंतर्गत अनुदानाची मागणी करणे, महालेखापाल नागपूर येथे खर्चाचा ताळमेळाचे काम विहीत मुदतीत पुर्ण करून निष्पत्तीपत्रे सादर करणे.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडुन घेण्यात येणा-या परिक्षेबाबत कार्यवाही करणे.
- सामान्य आस्थापना विभागातील अधिकारी/कर्मचारी यांची सेवापुस्तके अदयावत करणे.
- अधिकारी/कर्मचारी यांच्या रजेबाबत कार्यवाही करणे रजा प्रवास सवलत मंजुरीबाबत कार्यवाही करणे.
- अधिकारी/कर्मचारी यांच्या वेतन वाढीबीबत कार्यवाही करणे.
- जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या अधिनस्त वर्ग-1 व वर्ग-2 अधिकारी यांच्या रजा, वेतननिश्चिती, रजा प्रवास सवलत मंजुरी वेतन वाढ, पदभार कार्यमुक्त करणे इत्यादी बाबींवर कार्यवाही करणे.
- रजा रोखीकरणाबाबत कार्यवाही करणे.
- अधिकारी/कर्मचारी यांना मराठी व हिंदी भाषा उत्तीर्ण होण्यापासुन सुट देणेबाबतची कार्यवाही करणे
- परिविक्षादिन अधिकारी यांचा कार्यक्रम निश्चित करणे.
- अधिकारी/कर्मचारी यांना उच्च पदाकरीता परिक्षेला बसण्याबाबतची परवानगी देण्याबाबतची कार्यवाही करणे.
- अधिकारी/कर्मचारी यांना सेवानिवृत्त करण्याबाबतची परवानगी देण्याबाबतची कार्यवाही करणे.
- अधिकारी/कर्मचारी यांचे गोपनिय अहावल जतन करणे
- अधिकारी/कर्मचारी यांच्या रजेचा हिशोब ठेवणे
- चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची झेंडा डयुटी व रात्रपाळी डयुटी लावणे
- पदोन्नतीसाठी व कालब्ध पदोन्नतीसाठी गोपनिय अहवाल देणे.
- मिटींगसाठी शिपाई नियुक्ती आदेश तयार करणे.