बंद

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर अनुदान योजना

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे “१) वर वधूचे जातप्रमाणपत्र
२) वर वधूचे अधिवास प्रमाणपत्र
३) वर वधूचे शाळा सोडल्याचे दाखले
४) वर वधूचे आधारकार्ड
५) विहीत नमुन्यातील वर्तणुक प्रमाणपत्र
६) 100 रु. स्टॅम्प पेपरवर प्रथम लग्नाचे विहीत नमुन्यातील शपथपत्र ”

संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) 1.सामाजिक न्याय,सांस्कृतिक कार्य व क्रिडा विभाग,शासन निर्णय क्र.युटीए-1099/प्र.क्र.45/मावक-2 दि.30 जाने.1999
2.सामाजिक न्याय,सांस्कृतिक कार्य व क्रिडा विभाग,शासन निर्णय क्र.आजावि-2003/प्र.क्र.501/मावक-2 दि.6 ऑगस्ट 2004
3.सामाजिक न्याय,सांस्कृतिक कार्य व क्रिडा विभाग,शासन निर्णय क्र.आजावि-2007/प्र.क्र.191/मावक-2 दि. 1 फेब्रुवारी 2010″

निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी १) अर्जदाराचा अर्ज
2) आवश्यक कागदपत्रांची पुर्तता तपासणी
3)अर्जदाराचा प्रस्तावास मा. जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचेकडून मंजूरी प्रदान करणे ”

ऑनलाईन सुविधा आहे का –
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत
निर्णय घेणारे अधिकारी – जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद,वर्धा
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – सर्व कागदपत्रांसह प्राप्त अर्जास अर्ज सादर करतांनाच प्राथमिकस्तरावर मंजूरी प्रदान करण्यात येत. दर महिन्यात प्राप्त एकूण प्रस्तावास महिनाअखेर जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचेव्दारे अंतिम मंजूरी देण्यात येते

ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://grievances.maharashtra.gov.in/
कार्यालयाचा पत्ता जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सिविल लाईन वर्धा

संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-242783
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी dswozpwardha@gmail.com